महाराष्ट्र

काय फरक पडत नाही,असे का म्हणाले शरद पवार

मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना नाव व धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे गटाला दिल्याने राजकीय वर्तुळात आता पुढे काय अशा चर्चांना उधाण आले आहे. विविध प्रतिक्रिया राजकीय नेत्यांकडून येत आहेत. मात्र या निर्णयाची आणि या चर्चांची हवाच अनुभवी आणि मुरब्बी राजकारणी असलेले राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या प्रतिक्रियेनंतर निघून गेली आहे.

या सर्व घडामोडी नंतर शरद पवार यांच्या प्रतिक्रियेला फार महत्व आहे. या निर्णयानंतर पवार यांच्याकडून काय प्रतिक्रिया येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. पण जेव्हा शरद पवार बोलले तेव्हा मागील एक दाखला देत काय फरक पडत नाही अस म्हणत त्यांनी या विषयातील एक प्रकारे हावाच काढून घेतली.

शरद पवार यांनी दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी आणि काँग्रेस पक्षच उदाहरण दिलं आहे. ते म्हणाले हा तर निवडणूक आयोगाचा निकाल आहे. निकाल लागल्यानंतर चर्चा काही करता येत नाही. या निकालाने फार काही होत नसतं. मला आठवतं काँग्रेसमध्ये एकदा इंदिरा गांधी आणि इतर हा वाद झाला. त्यावेळी काँग्रेसची बैलजोडी खूण होती. पण ती बैलजोडी निवडणूक आयोगाच्या निकालाने गेली. पण काँग्रेसने त्यावेळी हात चिन्ह घेतलं. ते चिन्ह लोकांनी मान्य केलं. त्यामुळे त्याचा फार काही फरक पडत नाही. तसंच शिवसेनेच्या बाबतीत लोकं नवं चिन्ह मान्य करतील. ही चर्चा महिनाभर चालेल, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.

Img 20221126 wa02126927299965323449855

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये