पुणे शहर

कोथरूड मधील श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाची शिवजयंती निमित्त रंगरंगोटी व इतर कामे पूर्णत्वाकडे..

पुणे : श्री. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त कोथरूड मधील श्री. छत्रपती शिवाजी महाराज स्मारक पुतळ्याची रंगरंगोटी पूर्ण होत आली आहे. जयंतीनिमित्त स्मारकाचा परिसर आकर्षक पद्धतीने सजवण्यात येत आहे.

पुणे महापालिकेतील माजी गटनेते, नगरसेवक पृथ्वीराज सुतार यांच्या पाठपुराव्याने जयंतीनिमित्त ही कामे केली जात आहेत. कोथरूड मधील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक हे समस्त कोथरूडकरांचे शक्तीस्थान आहे, म्हणूनच याठिकाणी महाराजांची जयंती जल्लोषात साजरी केली जाते. त्यामुळे पृथ्वीराज सुतार यांच्या पाठपुराव्याने जयंतीच्या अनुषंगाने पालिकेच्या वतीने स्मारकाजवळ विविध कामे केली जात आहेत.

काही वर्षापर्वीच सुतार यांच्या प्रयत्नातूनच स्मारकाचे नूतनीकरण करण्यात आले असल्याने स्मारकाच्या सौंदर्यात भर पडली आहे. नूतनीकरणाच्या कामात स्मारकाच्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्या खालील चौथरा आकर्षक बनवला गेला, महाराजांच्या जीवनातील महत्वाचे प्रसंगांचे शिल्प रुपात त्याठिकाणी लावण्यात आले, कारंजे बसवण्यात आले, विद्युत रोषणाई करण्यात आली. त्यामुळे नूतनीकरण झाल्यानंतर स्मारक अधिक भव्य झाले आहे.

कोथरूड येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वरूढ पुतळा महापालिकेने बसवलेला पुण्यातील एकमेव अश्वरूढ पुतळा आहे. या शिवस्मारकापाशी हजारो शिवप्रेमी श्री छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी येत असतात त्यामुळे शिवजयंतीच्या आधी पुतळयाची रंगरंगोटी करणे, विदयुत विषयक, स्वच्छता विषयक अशी कामे त्वरीत करणे आवश्यक होते. त्यासाठी आपण महापालिका आयुक्तांशी पत्र व्यवहार करून पाठपुरावा केला होता. त्यामुळे प्रशासनाने ही कामे हाती घेऊन पूर्ण करत आणली असल्याचे पृथ्वीराज सुतार यांनी सांगितले.

Img 20221126 wa02126927299965323449855

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये