पुणे शहर

महिलांच्या सुरक्षेला महत्व देणार – चंद्रकांत मोकाटे; भाऊबीज निमित्ताने कोथरूड मधील महिलांशी संवाद

पुणे : कोथरूड विधानसभा मतदारसंघातील महिलांना जाणवणाऱ्या विविध समस्या सोडवण्यावर आपण प्राधान्य देणार असून, विशेषतः महिलांच्या सुरक्षेतेला महत्व देणार असून, महिलांना सुरक्षित वातावरण कसे राहील याकडे आपण लक्ष देणार असल्याचे कोथरूड विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार व माजी आमदार चंद्रकांत मोकाटे यांनी सांगितले.

मोकाटे रविवारी भाऊबीजेनिमित्त महिलांशी विविध ठिकाणी संवाद साधला. रविवारी भाऊबीजेनिमित्त कर्वेनगर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर, किस्कीद्धा नगर, सुतारदरा आदी ठिकाणी विठ्ठल रुक्मिणी मंदिरात काकड आरती सोहळ्यात सहभागी झाले. यावेळी महिलांनी त्यांचे औक्षण करून त्यांना ओवाळलं. आणि त्यांच्या समवेत भाऊबीज साजरी केली.

Img 20241020 wa0001435697684176070576

यावेळी मोकाटे यांनी भावुक होतं महिलांशी संवाद साधला. त्यांची आपुलकीने चौकशी केली. यानंतर बोलताना मोकाटे म्हणाले की, गेल्या काही वर्षात महिलावरील अत्याचारांचे प्रकार वाढत चालले आहेत ते रोखण्याची गरज आहे त्यासाठी आपण खास प्रयत्न करणार आहे.

आपण केवळ कोथरूड मतदारसंघच नव्हे तर संपूर्ण पुणे शहरात याविषयी जनजागृती करणार आहे त्यासाठी विविध ठिकाणी महिलांसाठी मोफत कायदेशीर सल्लागार संपर्क कार्यालय निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे विविध महाविद्यालये व शाळेमध्ये रॅगिंग कमिटी आहे का याची चौकशी करणार आणि नसल्यास तिथे नेमण्यास लावणार तसेच रॅगिंग कमिटीची दरमहा मिटिंग होते किंवा नाही याची चौकशी करून पाठपुरावा करणार आहे आपल्या दृष्टीने महिलांना सुरक्षित वातावरण करणे हिच खरी भाऊबीज ठरणार आहे. असे मोकाटे म्हणाले.

Img 20240404 wa0015281292591121734012341242
Img 20240404 wa0012281298193617916566931378
Img 20240404 wa0013281298602993728148316202

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये