पुणे शहर

बावधन मध्ये कोरोना लस देण्याची व्यवस्था करावी : कुणाल वेडे पाटील

बावधन :  बावधन परिसरातील ज्येष्ठ नागरिकांना बावधन परिसरातीलच पुणे महानगरपालिकेच्या वास्तु मध्ये लस देण्याची व्यवस्था तातडीने करण्याची मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेस खकवासला मतदार संघाचे अध्यक्ष कुणाल वेडे पाटील यांनी पुणे महापालिका आयुक्तांकडे केली आहे. Corona vaccination should be arranged in Bawadhan: Kunal Vede Patil

या संदर्भातील निवेदन कुणाल वेडे पाटील यांनी महापालिका आयुक्तांकडे दिले आहे.  शहरात कोरोना चा प्रादुर्भाव वाढू लागल्याने कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन वेडे पाटील यांनी केले आहे.

Img 20210223 wa0156

कोरोनाची लस आता आलेली आहे. 60 वर्षाच्या पुढील ज्येष्ठ नागरिकांना व 45 ते 60 वयोगटातील विविध आजार असलेल्या (डायबिटीस, बी.पी, कॅन्सर, डायलिसिस व इतर आजार) नागरिकांना लस देणे सुरू करण्यात आले असून शहरात ठिकठिकाणी केंद्र सुरू केली आहेत.  त्यामळे
बावधन परिसरातील नागरिकांना बावधन परिसरातील पुणे महानगरपालिकेच्या वास्तु मध्ये लस देण्याची व्यवस्था करण्यात यावी. अशी मागणी वेडे पाटील यांनी आयुक्तांकडे केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये