पुणे शहर

उध्दव ठाकरेंची पुण्यातील सभा कोथरुडमध्ये होणार की अन्य ठिकाणी? 

पुणे : कॉंग्रेसमध्ये आणि ठाकरे गटात मत मतांतरे झाल्याचं दिसून येत आहे. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे किंवा युवा नेते आदित्य ठाकरे यांची कोथरूडमध्ये सभा घेण्यावरून हा  महा विकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये चर्चा सुरू झाली असल्याची माहिती आहे. कोथरुडमध्ये सभा घेण्याऐवजी  इतर ठिकाणी सभा व्हावी अशी मागणी कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. त्यामूळे आता हि सभा कोथरूडला होणार की अन्य ठिकाणी यावर चर्चा रंगली आहे.

महाविकास आघाडीकडून सध्या रवींद्र धंगेकर यांच्या प्रचाराच्या सभेसाठी किंवा रोड शोसाठी मोठी तयारी करण्यात येत आहे. त्यासाठी रोज बैठका घेऊन निर्णय घेतले जात आहे. मात्र याच बैठकीत पदाधिकाऱ्यांमध्ये धूसफूस होत असल्याचं चित्र आहे.  सगळ्या सभा किंवा रोड शो फक्त धंगेकरांच्या प्रचारासाठीच नाही तर येत्या विधानसभा आणि महापालिका निवडणुकीची गणितं समोर ठेवून सभेचं किंवा रोड शोचं आयोजन करण्यात येत आहे. 

Img 20240404 wa00195661228638643442239

काँग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांनी कोथरूड विधानसभा मतदारसंघात उद्धव ठाकरे किंवा आदित्य ठाकरे यांची सभा घ्यावी, अशी मागणी केली. मात्र यावरुनच पदाधिकाऱ्यांमध्ये मतभेद सुरू आहेत.त्यामूळे हि सभा नेमकी कुठे होणार याची उत्सुकता लागली आहे.

Img 20240404 wa00142311409567432001146
Img 20240404 wa00154462680026350583661

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये