पुणे शहर

वारजे आयडॉल २०२४  कराओके गायन स्पर्धेत अंजली पांगारे ठरल्या प्रथम क्रमांकाच्या मानकरी..

बक्षीस वितरण सोहळा उत्साहात साजरा…

वारजे : गेले तीन दिवस सुरू असलेल्या वारजे आयडॅाल २०२४ कराओके गायन स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभ खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे आमदार भिमराव  तापकीर यांच्या शुभहस्ते पार पडला. वारजे आयडॅाल २०२४ या कराओके गायन स्पर्धेचा प्रथम क्रमांकाच्या मानकरी अंजली पांगारे या गायिका ठरल्या.

या स्पर्धेस जवळपास २५० ऑनलाईन , ऑफलाईन  नाव नोंदणी केलेल्या स्पर्धकांपैकी १५० स्पर्धकांनी प्रत्यक्ष स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला . यापैकी ३० स्पर्धकांनी उपांत्य फेरीत प्रवेश करून या ३० पैकी ७ क्रमांक या गायन स्पर्धेत काढण्यात आले आणि ४ उत्तेजनार्थ बक्षिसे देण्यात आली . माजी स्वीकृत नगरसेवक, भाजप सहकार आघाडीचे अध्यक्ष   सचिन दशरथ दांगट यांनी या स्पर्धेचे संयोजन केले होते.

Img 20240520 wa00088678982421911527556

यंदा प्रथमच आयोजन केलेल्या वारजे आयडॅाल २०२४ या कराओके गायन स्पर्धेचा प्रथम क्रमांकाच्या मानकरी अंजली पांगारे या गायिका ठरल्या . द्वितीय क्रमांक प्रिती वाटे , तृतीय क्रमांक करण गायकवाड , चतुर्थ क्रमांक साई तामकर , पाचवा क्रमांक सुगंध पंडित , सहावा क्रमांक मोनिका ओड , सातवा क्रमांक भीमा पंडित , अश्या स्पर्धकांनी आपल्या उत्कृष्ट गायनाने वारजे आयडॅाल २०२४ हा पुरस्कार पटकावला .        

Img 20240404 wa00195661228638643442239

या गायन स्पर्धेच्या बक्षीस समारंभास आमदार भिमराव तापकीर यांच्यासह भाजप खडकवासला विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष गणेश वरपे,  सचिन मोरे, जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर भोरकडे,  नाट्य परिषदेचे खजिनदार अशोक जाधव , सुप्रसिद्ध गायक अनिल घाडगे , संजय मरळ , माजी स्वीकृत नगरसेवक संजय भोर , आकांक्षा नारी मंच अध्यक्षा मनीषा दांगट , खडकवासला अध्यक्ष भावना पाटील , राष्ट्रवादीचे देवेंद्र सूर्यवंशी , रजनी पाचंगे , सुभाष अग्रवाल , चुनीलाल शर्मा ,  संयोजन समितीचे फिल्म निर्माता राजीव पाटील , निवेदक अशोक उनकुले यांच्यासह स्पर्धक आणि कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते .

वारजे आयडॅाल २०२४ या कराओके गायन स्पर्धेचे परिक्षक म्हणुन अशोक जाधव , संजय मरळ , जितेद्र भुरूक , अनिल घाटगे यांनी काम पाहिले . सुत्रसंचालन अशोक उनकुले , चंद्रकांत पंडीत यांनी केले .

Img 20240404 wa00142311409567432001146
Img 20240404 wa00154462680026350583661

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये