महाराष्ट्र

तर शिवसेनेचे अस्तित्व राहिलं नसतं : अमित शाह

सिंधुदुर्ग : निवडणुकी आगोदर भाजपान मुख्यमंत्रिपदासह सत्ता वाटपात समसमान स्थान देणार सांगितलं होतं याबाबत अमित शहा यांनी बंद दाराआड वचन दिलं होत असा दावा शिवसेनेकडून करण्यात आला होता. भाजपन वचन पाळले नाही असं सांगत शिवसेनेनं राष्ट्रवादी काँग्रेस व कॉंग्रेस बरोबर महाविकास आघाडी करत सरकार स्थापन केली मात्र आपण अस कोणतच वचन बंद दार आड दिल नसल्याचा खुलासा करत देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले. Shiv Sena would not have existed;  Amit Shah

नारायण राणे यांच्या लाईफ टाईम वैद्यकीय महाविद्यालयाचे उद्घाटन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते झाले.  यावेळी शाह यांनी महाराष्ट्रात सत्ता स्थापने वेळी शिवसेनेकडून केले गेलेले सर्व दावे फेटाळून लावत महाविकास आघाडीतील मित्रपक्षांवर टीका केली.

शाह म्हणाले महाराष्ट्रातील तीन चाकाचे सरकार सर्व आघाड्यांवर अपयशी ठरत आहे. जनतेने जो जनादेश दिला होता त्याचा अपमान करत सत्तेच्या लालसेपोटी येथे सरकार स्थापन करण्यात आलं. महाराष्ट्रात आम्ही देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढलो व सर्वाधिक जागा जिंकून आल्या. त्यानंतर ही इथं तीन चाकी रिक्षा सरकार स्थापन झालं

Img 20210116 wa0007

जे मानत आहेत आम्ही वचन तोडलं त्यांना सांगू इच्छितो आम्ही वचनावर ठाम राहणारी माणस आहोत. आणि म्हणूनच बिहार मध्ये आम्ही निवडणूक लढलो व दिलेल्या वचनानुसार सरकार आलं. जास्त येऊनही तिथे नितीश कुमारांना मुख्यमंत्री केलं. आम्ही बंद दाराआड कधी वचन देत येत नाही. जे काय करतो ते सर्वांसमोर करतो.

निवडणुकीदरम्यान प्रत्येक सभेत आम्ही एनडीए ला निवडून द्या असेच सांगून देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार असे सांगत होतो मग त्यावेळी उद्धव ठाकरे का शांत राहिले. असा सवालही यावेळी शाह यांनी उपस्थित केला. शिवसेना ज्या मार्गावर चालत आहे त्या रस्त्याने आम्ही चालणार नाही. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना आम्ही तुमच्या मार्गाने चाललो असतो तर तुमच्या पक्षाचा अस्तित्व राहिले नसते असं म्हणत शाह यांनी शिवसेनेवर निशाणा साधला.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये