महाराष्ट्र

इधर उधर की बात मत कर काफीला कैसे लुटा ये बता मुश्रीफांचा पाटलांवर पलटवार


मुंबई : इधर उधर की बात मत कर काफीला कैसे लुटा ये बता ; मी काहीच केलं नाही फक्त वेगवेगळ्या रुपाने मारण्यासाठी आलेल्या बैलाची शिंग पकडली.अशा शब्दात ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या टीकेनंतर पलटवार केला आहे.

राज्यात काही घडलं की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे जयंत पाटील हे बोलण्या आधीच मुश्रीफ विधान करत असतात. त्यांची कृती म्हणजे हा बैल मुझे मार व निष्ठा दाखवण्याची केविलवाणी धडपड असते असं विधान चंद्रकांत पाटील यांनी केलं होत.

यावर प्रतिक्रिया देताना मुश्रीफ म्हणाले निष्ठा दाखवणारी मला केविलवाणी धडपड करावी लागते. हे विधान हास्यास्पद आहे. सत्तेचा वापर करून शत्रूची ही भले करण्याचा माझा प्रयत्न असतो लोक वैचारिक विरोध करत असतात. आपले शत्रू नसतात. पाटील यांनी निवडणूक शपथपत्रात कंपन्यांचे संचालक असलेले लावल्याबद्दल त्यांच्यावर फौजदारी खटला करावा.अशा आशयाच्या बातम्या आल्या आहेत. याबद्दल मला काही घेणं देणं नाही असं व्यक्तिगत जीवनात किंवा त्याच्या वाळलेल्या पाचोळ्यावर हि मी पाय ठेवत नाही ती माझी संस्कृती नाही. असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

मी त्यांना माफी मागण्याची विनंती केली होती माफी न मागितल्यास त्यांच्यावर फौजदारी दाखल करण्यास सांगितलं होतं त्याचे पुरावे देखील त्यांच्याकडे पाठवले ते अद्याप त्यावर त्यांचे उत्तर नाही की माफी नाही याशिवाय दोन रुपयांना आर्सेनिक अल्बम गोळ्या खरेदी करून द्याव्यात. असे आवाहन देखील केलं होतं त्यावर त्यांचे उत्तर नाही असे म्हणाले.

Related Articles

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये