गणेशोत्सवा संदर्भात आढावा बैठक
गणेशोत्सवा संदर्भात आढावा बैठक
पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या गणेशोत्सवाच्या काळात नागरिकांनी अनावश्यक गर्दी टाळून ‘घरातील गणपती, घरीच विसर्जन करावे’ असे महापालिकेच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे. या आवाहनासंदर्भात महापालिकेच्या तयारीचा आढावा महापौर मुरलीधर मोहोळ यांनी बैठकीत घेतला .
या बैठकीला उपमहापौर सरस्वती शेंडगे, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, सभागृह नेते धीरज घाटे, महापालिका आयुक्त विक्रम कुमार, क्षेत्रिय कार्यालयाचे विभागीय अधिकारी व वॉर्ड ऑफिसर उपस्थित होते.
या बैठकीत घरातील गणपतीचे, घरीच विसर्जन व्हावे त्या अनुषंगाने काय पर्याय उपलब्ध करून दिले आहेत तसेच
मूर्तीदान करणार्या नागरिकांसाठी प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयात प्रभागनिहाय मूर्तीसंकलन केंद्र किती ठिकाणी करणार यावर चर्चा करण्यात आली. त्या बरोबरच
महापालिकेमार्फत पुरविण्यात येणार्या अमोनियम बायकार्बोनेटची वितरण व्यवस्था, फिरत्या हौदाचा मार्ग कसा असावा, वेळापत्रक कसे असावे अशा अनेक विषयां चा या बैठकीत आढावा घेण्यात आला.




