पुणे शहर
राजीव गांधी यांना अभिवादन
राजीव गांधी यांना अभिवादन
पुणे : भारताचे माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त महापालिकेतील तैलचित्रास महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी सद्भावना दिनानिमित्त उपस्थित सर्वांना सद्भावना शपथ देण्यात आली. याप्रसंगी उपमहापौर सरस्वती शेंडगे, महापालिका आयुक्त विक्रम कुमार व इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.




