पुणे शहर

जैन समाजातील हिरा निखळला

पुणे : जैन समाजातील ” हिरा ” स्व. माणिकचंद रामलाल भंडारी यांचे वृद्धापकाळाने निधन झाले आहे.जैन समाजातील ” हिरा ” स्व. माणिकचंद रामलाल भंडारी गेले ४० वर्ष सामाजिक व धार्मिक कार्यात स्वतःला व्हाऊन घेतले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघात लहानपणा पासून स्वयंसेवक होते. १९७४ पासून जनसंघात सक्रिय सभासद असून अनेक लोकसभा,विधानसभा निवडणुकीत मोलाचे योगदान राहिले. १९८४-८५ साली पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा अध्यक्ष पदी निवड करण्यात आली. १९९२ मध्ये पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड वार्ड क्र ३ या लोक संख्येच्या वॊर्ड मधून भरघोस मतांनी निवडून आले, या वेळी भाजप कडून कॅन्टोन्मेंट बोर्डाचे उपाध्यक्ष पद त्यांना देण्यात आले. १९९७ साली त्यांच्या कामाची पावती रुपी भाजप पक्षातर्फे त्यांना  निवडणुकीचे तिकीट देण्यात आले व ते मोठ्या मताने विजयी झाले.कॅम्प भागातील अनेक गणेश मंडळांनी त्यांना अध्यक्ष पदावर  विराजमान केले. 

भंडारी यांनी २५ वर्ष जनहित नागरी सहकारी पतसंस्थेत संचालक म्हणून बऱ्याच गरजू व होतकरू लोकांना कर्ज उपलब्ध देण्यात मदत केली. मुक्तिधाम येथे विधुत दाहिनी ची व्यवस्था त्यांनी करून दिली. 

जैन समाजाचे महावीर उत्सव समिती च्या अध्य्क्ष पदी तर मीरा आनंद परिसरातील वासुपूज्य स्वामी जैन मूर्ती पूजक च्या सचिव पदाने अनेक जैन समाजातील प्रस्स्ने मार्गी लावले. जैनांचे सण म्हणजे महावीर जयंती असो किव्हा पर्युषण प्रत्येक उत्सवात पुणे कॅम्प परिसरातील जैनांचे नेतृत्व करीत पुढाकाराने प्रत्येक कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडायचे.  

नमस्कार जैन ग्रुप थापना करून समजते शाररिक अपंग, आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांना शैक्षणिक, आर्थिक मदत त्यांनी केली. २०१४ साली पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डच्या निवडणुकीत भाजपा नेते गिरीश बापट, दिलीप कांबळे यांना विशेष सहकार्य करत उमेदवारांना निवडून आणण्यात मदत केली.  विविध पदांवर राहून समर्थपने आपल्या कार्यकाळातील समाजाला सेवा दिली. अनेक राष्ट्रीय भाजपा नेते अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, उमा भारती, भैरवसिंग शेखावत अस्या अनेक नेत्यांचे सहवास त्यांना लाभले. 

Img 20210319 wa0097

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये