पुणे शहर

निर्माल्य संकलन करणाऱ्या वाहनाचे उद्घाटन

पुणे : गणेशोत्सव काळात तयार होणाऱ्या निर्माल्यापासून खत निर्मितीसाठी निर्माल्य संकलन करणाऱ्या निर्माल्य वाहनाचे उद्घाटन नगरसेविका व अध्यक्षा महिला व बालकल्याण समिती पुणे महानगरपालिका ज्योत्स्ना एकबोटे यांच्या हस्ते करण्यात आले.

भाजपाचे शिवाजीनगर व्यापारी आघाडी अध्यक्ष विकास डाबी हे गेली १३ वर्ष अविरतपणे गणेशोत्सव काळात निर्माण होणारे निर्माल्य संकलन करत आहेत व त्यापासून निर्माण होणारे खत नागरिकांना मोफत वाटप करत आहेत. गणेशोत्सव काळात गणेश पूजनासाठी मोठ्या प्रमाणावर फुले, फळे, नारळ यांचा वापर होऊन मोठ्या प्रमाणावर निर्माल्य तयार होते. सदर निर्माल्य संकलन करण्यासाठी हे निर्माल्य वाहन आपल्या दारी हा अतिशय स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला आहे.

सदर प्रसंगी नगरसेवक आदित्य माळवे,शहर उपाध्यक्ष योगेश बाचल , शिवाजी नगर सरचिटणीस गणेश बगाडे,  अपूर्व खाडे, हेमंत डाबी, प्राजक्ता पाटील, वैदेही काळे, मनिषा सुर्वे व लक्ष्मण नलावडे,संतोष काळे यांच्या सामवेत अनेक नागरिक उपस्थित होते. या उपक्रमासाठी शिवाजीनगर महिला आघाडी अध्यक्षा अपर्णा गोसावी, शिवाजीनगर अध्यक्ष सतिश बहिरट, सोशल मिडिया अध्यक्ष निलेश धोत्रे यांचे  विशेष सहकार्य लाभले.यंदाचे वर्ष या उपक्रमाचे १४ वर्षे असून सुमारे दीड टन निर्मिल्य सर्व मंडळा कडून संकलन करण्यात आले .या उपक्रमाचे संयोजन भाजपा शिवाजीनगर व्यापारी आघाडी अध्यक्ष विकास डाबी यांनी केले होते.

Related Articles

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये