राष्ट्रीय
माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांचे निधन

नवी दिल्ली : माजी राष्ट्रपती, भारतरत्न प्रणब मुखर्जी यांचं आज निधन झालं असून याबाबतची माहिती त्यांचा मुलगा अभिजित मुखर्जी यांनी ट्विटरद्वारे दिली आहे. वयाच्या ८४ वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
मागील काही दिवसांपासून आर्मी हॉस्पिटल मध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. १० ऑगस्ट रोजी त्यांच्यावर मेंदूची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. आपल्याला कोरोना झाल्याची माहिती त्यांनी ट्विटरद्वारे दिली होती.
गेले काही दिवस ते व्हेंटिलेटरवर होते.
भारताच्या विकासामध्ये त्यांचे योगदान मोलाचे होते. त्यांच्या जाण्याने देशाचं मोठं नुकसान झालं आहे. राजकारणातल एक विद्यापीठ म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्यासह विविध मान्यवरांनी शोक व्यक्त केला आहे.



