भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व युवा नेते लक्ष्मण मेघावत यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण व आरोग्य शिबीराचे आयोजन

पुणे : भाजप प्रदेशाध्यक्ष आणि आमदार चंद्रकांत पाटील व युवा नेते लक्ष्मण मेघावत यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण व आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष व कोथरूड चे लोकप्रिय आमदार चंद्रकांत दादा पाटील व युवा नेते लक्ष्मण मेघावत यांच्या वाढदिवसानिमित्त पाषाण टेकडीवर वृक्षारोपण करण्यात आले,काही वृक्षांची लागवड करण्यात आली तर 100 वृक्षांचा वर्षभराचा देखभाल खर्च उचलण्यात आला,यावेळी दिपक श्रोते, दुर्गेश त्रिवेदी, राजेश उत्तरवार उपस्थित होते.

तसेच पाषाण येथील लमान वस्तीत बाणेर-बालवाडी मेडिकल असोसिएशन चा सहयोगाने आरोग्य शिबीर घेण्यात आले,भारतीय जनता पक्षाचे जेष्ठ नेते ॲड.नितीन कोकाटे यांच्या हस्ते शिबीराचे उद्घाटन करण्यात आले वस्तीतील 500 नागरिकांनी या शिबीराचा लाभ घेतला. भारतीय जनता पक्षाचे पुणे शहर उपाध्यक्ष राहुल कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली व लहु खेतावत, माणिक खेतावत, गोविंद खेतावत, हणमंत खेतावत, गोपी मेघावत, दत्ता खेतावत व इतर मान्यवर यांच्या उपस्थितीत कार्यक्रम आयोजित करण्यात आला.









