वारजेतील लसीकरण केंद्रावरील गैरसोयी संदर्भात किरण बारटक्के यांचे महापौरांना निवेदन…

वारजे : वारजे येथील कै.अरविंद गणपत बारटक्के रूग्णालय येथे नव्याने सुरू केलेल्या कोविड वॅक्सीन (लसीकरण) केंद्रात लसिकरण करण्यासाठी मोठ्या
प्रमाणात ज्येष्ठ नागरिक येत आहेत. याच रूग्णालयात कोरोना चाचणी केंद्र सुध्दा सुरू आहे. एकाच ठिकाणी दोन्ही सुविधांचा लाभ घेण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणावर येत असल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याचा धोका आहे. त्यामुळे दोन्ही सुविधांसाठी वेगवेगळी मंडप व इतर व्यवस्था करण्याची मागणी माजी नगरसेवक किरण बारटक्के यांनी केली आहे.
या लसीकरण केंद्रावरील गैरसोयी बाबत आज किरण बारटक्के यांनी महापौर मुरलीधर मोहोळ यांना निवेदन देऊन चर्चा केली. यावेळी महापौरांनी संबंधितांशी चर्चा करून योग्य ती सुविधा देण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

या केंद्रावर ज्येष्ठ नागरिकांना लस घेण्यासाठी वेगळी मंडप व्यवस्था करून ज्या ज्येष्ठ नागरिकांना दर दिवशी लस देण्याचे नियोजित केले जाते त्यांना टोकन पध्दतीने सदर ठिकाणी क्रमांकाने बोलविल्यास नागरिकांची गैरसोय होणार नाही तसेच लस घेण्यासाठी येणाऱ्या नागरीकांना बसण्यासाठी खुर्च्या व पिण्याच्या पाण्याची वेगळी व्यवस्था करण्यात यावी जेणेकरून चाचणीसाठी येणारे संशयित कोरोनाचे रूग्ण व लस घेण्यासाठी येणारे नागरिक यांचा संपर्क येणार नाही याबाबत काळजी घेण्यात यावी. व रुग्णालयात कर्मचारी वर्ग ही कमी असल्याने अनेक अडचणी येत आहेत त्यामुळे कर्मचारी संख्या वाढवण्याची मागणी ही बारटक्के यांनी केली आहे.



