महिला दिनानिमित्त कर्वे संस्थेमधील वसतीगृहातील विद्यार्थिनींना शालेय वस्तूंचे वाटप…

कर्वेनगर : जागतिक महिला दिनानिमित्त कर्वेनगर येथील महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेमधील वसतीगृहातील विद्यार्थिनींना शालेय वस्तूंचे व कोरोना प्रतिबंधक सॅनिटायझर व मास्कचे वाटप करण्यात आले .Distribution of school supplies to the students living in the hostel of Karve Sanstha on the occasion of Women’s Day …
कार्यक्रमाचे आयोजन लोकसेवक प्रविण माणिक दुधाने व तेजल मयूर दुधाने यांच्या वतीने करण्यात आले होते. यावेळी ॲड.मयूर दुधाने, सामाजिक कार्यकर्ते अमित सोंडकर, गणेश गोकुळ, सिद्धार्थ भालेकर, सागर खानेकर उपस्थित होते.
प्रविण दुधाने म्हणाले, कर्वेनगर मधील महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेत शिक्षण घेऊन अनेक महिलांनी वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे. या संस्थेतील वसतिगृहात राहणाऱ्या मुलींनी ही परंपरा कायम ठेवली आहे. महिला सक्षमीकरणासाठी महर्षी कर्वे यांनी स्त्री शिक्षण संस्था सुरू केली. आज महिला प्रत्येक क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवत असताना महर्षी कर्वे यांचे महिला सक्षमीकरणाचे स्वप्न साकार होताना दिसत आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड.राहुल पाटील यांनी केले व संस्थेच्या फाळके मॅडम यांनी आभार व्यक्त केले.




