देशविदेश

१२ वीची परीक्षा रद्द ; मोदी सरकारचा मोठा निर्णय…

दिल्ली : देशातील वाढत्या कोरोना संसर्गाचा धोका लक्षात घेता सीबीएसईच्या म्हणजेच  माध्यमिक परीक्षा मंडळाच्या  बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीनंतर  घेण्यात आला आहे. 12th exam canceled;  Big decision of Modi government …

सुप्रीम कोर्टाला केंद्र सरकारनं दोन दिवसात याबाबत निर्णय घेऊ असं सांगितलं होत त्यानुसार आज बारावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत.

या निर्णयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हंटले आहे की बारावीच्या निकालाची कार्यपद्धती लवकरचं जाहीर केली जाईल. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विद्यार्थ्यांचं आरोग्य आणि सुरक्षा आमचं पहिलं प्राधान्य आहे.

Img 20210522 wa0207

देशातील कोरोना रुग्णसंख्या पार्श्वभूमीवर
अ‌ॅड. ममता शर्मा यांनी सुप्रीम कोर्टात परीक्षा रद्द करण्यासाठी याचिकाद्वारे मागणी केली आहे. त्यांच्या याचिकेवर हस्तक्षेप याचिका देखील दाखल झालेल्या आहेत. सुप्रीम कोर्ट या संदर्भात गुरुवारी म्हणजे 3 जून रोजी अंतिम निर्णय देण्याची शक्यता आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये