पुणे शहर

गृहिणी आणि घरकामगार महिलांनी आरोग्याची काळजी घ्यावी – महापौर मुरलीधर मोहोळ.

महिलांची रोगप्रतिकारशक्ती वाढावी यासाठी आरोग्य किटचे वाटप – हर्षदा फरांदे.

पुणे : गृहिणी आणि घरकामगार महिलांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी कारण त्याच आपल्या घरातील सदस्यांना कोरोनाच्या तिसऱ्या लाटेपासून वाचवू शकतात .असे आवाहन महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केले. कोरोनाची दुसरी लाट ओसरत असली तरी अद्याप धोका टळलेला नाही आणि तज्ञ् तिसऱ्या लाटेचा धोका असल्याचे सांगत आहेत, त्यामुळे आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे असेही महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले.

कोथरूड महिला मोर्चाच्या अध्यक्षा हर्षदा फरांदे यांनी केदार एम्पायर व नेहरू वसाहतीतील महिलांसाठी रोगप्रतिकारशक्ती वाढवीणाऱ्या औषधी किट च्या वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला होता, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी शिक्षण समिती अध्यक्ष नगरसेविका मंजुश्री खर्डेकर, नगरसेवक वा भाजप सरचिटणीस दीपक पोटे, प्रवक्ता संदीप खर्डेकर, नगरसेवक जयंत भावे,शहर चिटणीस प्रशांत हरसुले, कोथरूड मंडल अध्यक्ष पुनीत जोशी, सरचिटणीस अनुराधा एडके, उपाध्यक्ष राज तांबोळी, महिला मोर्चा सरचिटणीस केतकी कुलकर्णी, उपाध्यक्ष पल्लवी गाडगीळ,आय टी सेल च्या शहर संयोजिका कल्याणी खर्डेकर,विद्या टेमकर, सुप्रिया माझीरे, नेहा तिळगूळकर,राजेंद्र येडे, रामदास गावंडे, श्रीकांत गावंडे, चंद्रकांत पवार इ उपस्थित होते.

Img 20210522 wa0207

यावेळी बोलताना महिला आघाडी अध्यक्ष हर्षदा फरांदे यांनी कार्यक्रमा मागची भूमिका स्पष्ट करताना सांगितले की वस्ती विभागातील महिलांची रोगप्रतिकारशक्ती वाढावी यासाठी व्हिटॅमिन सी, मल्टिव्हिटॅमिन यासह मास्क वा सॅनिटायझर चे वाटप करताना भगिनींना तिसऱ्या लाटेपासून सुरक्षित राहण्यासाठी शिक्षित करत आहोत. विविध वस्त्यांमध्ये असे कार्यक्रम आयोजित करण्यावर महिला मोर्चाचा भर असणार आहे असेही फरांदे म्हणाल्या.

नगरसेविका मंजुश्री खर्डेकर म्हणाल्या की कुटुंबातील प्रत्येक सदस्यांची काळजी वाहणारी महिला स्वतःच्या आरोग्याकडे कडे मात्र दुर्लक्ष करते, त्यामुळे त्यांच्या आरोग्यरक्षणासाठी महिला मोर्चा ने उचललेले पाऊल महत्त्वाचे आणि कौतुकास्पद असल्याचे ही सौ. खर्डेकर म्हणाल्या. यावेळी संदीप खर्डेकर, दीपक पोटे, जयंत भावे आणि पुनीत जोशी यांनी देखील आपले विचार व्यक्त केले.महापौरांच्या हस्ते महिलांना आरोग्य सुरक्षा किट चे वाटप करण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कल्याणी कुलकर्णी यांनी केले तर सुप्रिया माझीरे यांनी आभार प्रदर्शन केले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये