सह्याद्री कुणबी संघ, पुणे शहराचा १७ वा वर्धापन दिन उत्साहात संपन्न ; सह्याद्री शिवकन्या संघाची ही करण्यात आली स्थापना..

पुणे : सह्याद्री कुणबी संघ, पुणे शहराचा १७ वा वर्धापन दिन विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून उत्साहात संपन्न झाला. कोथरूड मधील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात यानिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या “कोकणची लोककला ‘नमन” या कार्यक्रमला मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
यावेळी समाजात विविध क्षेत्रात उत्तमोत्तम कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना “सह्याद्री रत्न” पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
तर संघाच्या शेकडो युवतींच्या सहभागाने “सह्याद्री शिवकन्या संघाची स्थापना” ॲड. अपूर्वा सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

सह्याद्रीच्या कोथरूड विभाग, पर्वती विभाग, कात्रज विभाग, प्रमाणे धायरी विभागाची स्थापना देखिल या कार्यक्रमात करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष पदाचे मानकरी शंकरदादा घडशी ठरले, यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून कोकणचे आमदार किरण भैया सामंत यांची कन्या ॲड. अपूर्वा सामंत, सह्याद्री हॉस्पिटलचे सचिन कुलकर्णी, अवधूत कदम, लांजा तालुक्यातून संतोषजी रेवाळे, वसंत घडशी, तर पुणे शहरातून धनंजय जाधव, सचिन दांगट, नवनाथ जाधव, अश्विनी जाधव, अल्पना वरपे, श्रद्धा प्रभुणे, सुरेखा होले आदी पाहुण्यांची उपस्थिती लाभली.



कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष रामाने, अमोल चिनकटे, प्रज्ञा घडशी, अश्विनी गोरुले, विराज डाकवे यांनी केले. या वर्धापनदिनाचे आयोजन महाराष्ट्र प्रांत कार्याध्यक्ष – गणपत घडशी, अध्यक्ष – विलास घडशी, पुणे शहर अध्यक्ष- सतिश डाकवे, महिला अध्यक्षा- अंकिता शिगवण यांनी केले होते. तसेच हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व पदाधिकारी व सहकाऱ्यांनी मोलाचे योगदान दिले.


