पुण्यातील ३६ मोटर ड्रायव्हिंग स्कूल प्रशिक्षण संस्थांना ‘अ’ मानांकन पत्र प्रदान..

प्रादेशिक परिवहन कार्यालय पुणे राज्यातील पहिला ‘अ’ मानांकन पत्र प्रदान सोहळा संपन्न!
‘अ’ मानांकन मिळविण्यात मोटार ड्रायव्हिंग स्कूल ओनर्स असोसिएशन महाराष्ट्र राज्य अव्वल स्थानी!
पुणे : पुणे शहरातील मोटार ड्रायव्हिंग स्कूल प्रशिक्षण संस्थांची तपासणी करून ‘अ ‘दर्जा गुणवत्ता प्राप्त करणाऱ्या एकूण 36 सरकारमान्य ड्रायव्हिंग स्कूल संचालकांना मानांकन पत्र प्रदान सोहळा प्रादेशिक परिवहन कार्यालय पुणे येथे पार पडला.
संपूर्ण महाराष्ट्रात परिवहन आयुक्त कार्यालय महाराष्ट्र राज्य यांच्या आदेशानुसार तपासणी पूर्ण झाल्यानंतर हे मानांकन प्रदान करणारे प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय पुणे हे राज्यातील प्रथम कार्यालय ठरले आहे.
सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी प्रादेशिक परिवहन अधिकारी पुणे डॉ. अजित शिंदे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी पुणे संजीव भोर यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अनंत भोसले सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी पुणे यांनी केले

मोटार ड्रायव्हिंग स्कूल ओनर्स असोसिएशन महाराष्ट्र राज्य यांच्याशी संलग्न असलेल्या पुणे शहर मोटार ड्रायव्हिंग स्कूल असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी व सभासदांनी ‘अ’ मानांकनात अव्वल स्थान पटकावले. 100 वर्षापेक्षा जास्त काळ सरकारमान्य ड्रायव्हिंग स्कूल क्षेत्रात चौथी पिढी कार्यरत असलेले आपटे मोटार स्कूल अलका टॉकीज पुणेचे संचालक विलास आपटे हे असोसिएशनचे कार्याध्यक्ष आहेत तर कुंभार मोटार ड्रायव्हिंग स्कूल नवी पेठ पुणे चे संचालक यशवंत कुंभार हे असोसिएशनचे महासचिव आहेत. न्यू विनायक मोटर ड्रायव्हिंग स्कूल कोथरूड पुणेचे संचालक राजू घाटोळे मोटार ड्रायव्हिंग स्कूल तसेच महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष आहेत.
राजू घाटोळे यांच्या वडिल विनायक ड्रायव्हिंग स्कूल सहकार नगर पुणे 9 चे संचालक कुंडलिक मारुती घाटोळे यांचा 72 वर्षाचा प्रशिक्षक म्हणून अनुभव आहे ते 1971 रोजी पुण्यातील डबल डेकर बस शिकवणारे पहिले प्रशिक्षक होते. त्यांच्या प्रशिक्षण संस्थेला सुद्धा अ मानांकन मिळाले आहे.



तसेच मोटार ड्रायव्हिंग स्कूल ओनर्स असोसिएशन महाराष्ट्र राज्य कोषाध्यक्ष ॲड.निलेश गांगुर्डे यांचे उदय मोटार ड्रायव्हिंग स्कूल लेक टाऊन कात्रज पुणे, मोटार ड्रायव्हिंग स्कूल ओनर्स असोसिएशन महाराष्ट्र राज्य वरिष्ठ उपाध्यक्ष अनंत कुंभार यांचे श्री व्यंकटेश्वरा मोटार ड्रायव्हिंग स्कूल, मोटार ड्रायव्हिंग स्कूल ओनर्स असोसिएशन महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष भाऊसाहेब कुदळे यांचे लॉर्ड रामा मोटार ड्रायव्हिंग स्कूल निरा जेजुरी, पुणे शहर मोटर ड्रायव्हिंग स्कूल असोसिएशन पुणे शहराचे महासचिव नितीन भांबुरे यांचे नितीन मोटार ड्रायव्हिंग स्कूल एकलव्य कॉलेज कोथरूड पुणे, मोटार ड्रायव्हिंग स्कूल ओनर्स महाराष्ट्र राज्य सचिव संजय सोनवणे यांचे क्लासिक मोटर ड्रायव्हिंग स्कूल एन आय बी एम रोड कोंढवा , भूमाता ब्रिगेड च्या सचिव पुष्पक केवडकर यांचे रामलिंग मोटार ड्रायव्हिंग स्कूल शिरूर पुणे, पुणे शहर मोटार ड्रायव्हिंग स्कूल असोसिएशन पुणे कात्रज विभागाचे अध्यक्ष सचिन गुंड यांचे स्वराज मोटर ड्रायव्हिंग स्कूल कात्रज पुणे
पुणे शहर मोटार ड्रायव्हिंग स्कूल असोसिएशन पुणे शहर उपाध्यक्ष निलेश गिरी गोसावी कैलास गिरी यांचे मोटर ड्रायव्हिंग स्कूल अंबामाता मंदिर कात्रज व कैलास गिरी मोटर ड्रायव्हिंग स्कूल कात्रज, पुणे शहर मोटर ड्रायव्हिंग स्कूल असोसिएशन पुणे शहर उपाध्यक्ष जगदीश मुळे यांचे जगदीश मोटार ड्रायव्हिंग स्कूल नऱ्हे आंबेगाव, पुणे शहर मोटार ड्रायव्हिंग स्कूल शहर उपाध्यक्ष भरत गायकवाड यांचे भरत मोटार ड्रायव्हिंग स्कूल दत्तनगर आंबेगाव , पुणे शहर मोटार ड्रायव्हिंग स्कूल असोसिएशन शहर उपाध्यक्ष वीरेंद्र आंबेठी यांचे वीरेंद्र मोटार ड्रायव्हिंग स्कूल कुमार पार्क बिबवेवाडी , मोटार ड्रायव्हिंग स्कूल ओनर्स असोसिएशन महाराष्ट्र राज्य सोशल मीडिया प्रमुख आशिष पवार यांचे स्वरा मोटर ड्रायव्हिंग स्कूल सासवड पुणे
खराडी विभागाचे प्रमुख गणेश देवकर यांचे गणेश मोटर ड्रायव्हिंग स्कूल खराडी पुणे, पुणे शहर मोटार ड्रायव्हिंग स्कूल असोसिएशन पुणे सोशल मीडिया विभाग प्रमुख अक्षय काळे यांचे न्यू अक्षय मोटार ड्रायव्हिंग स्कूल सोमवार पेठ पुणे, हडपसर विभागाचे प्रमुख सुमित बाजारे यांचे न्यू प्रगती मोटर ड्रायव्हिंग स्कूल हडपसर, मोटार ड्रायव्हिंग स्कूल ओनर्स असोसिएशन महाराष्ट्र राज्याचे सभासद निलेश बडदे यांचे योगीराज मोटार ड्रायव्हिंग स्कूल के के मार्केट पुणे,
मोटार ड्रायव्हिंग स्कूल ओनर्स असोसिएशन महाराष्ट्र राज्य सभासद श्री गायकवाड यांचे श्री मोटार ड्रायव्हिंग स्कूल या प्रशिक्षण संस्थांना यावेळी अ मानांकन प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.
पुणे शहरातील 36 ड्रायव्हिंग स्कूल संचालकांना या प्रसंगी सन्मानित करण्यात आले. एकूण मानांकनाच्या 70 टक्के मानांकन मिळविण्यात मोटार ड्रायव्हिंग स्कूल ओनर्स असोसिएशन महाराष्ट्र अव्वल स्थानी आहे. यावेळी एकनाथ ढोले विठ्ठल मेहता, अनंत कुंभार, उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्र संचालन शाहिद जमादार, वरिष्ठ मोटार वाहन निरीक्षक पुणे यांनी केले. आभार प्रदर्शन रेश्मा शेख सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक यांनी केले. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पुष्पक केवडकर,अक्षय काळे, गणेश देवकर, भरत गायकवाड यांनी विशेष मेहनत घेतली.












अ मानांकन प्राप्त मोटर ड्रायव्हिंग स्कूल
१) कुलकर्णीज् न्यू मोटार स्कूल
२) आपटे मोटार स्कूल
३) कुंभार मोटार ड्रायव्हिंग स्कूल
४) विनायक मोटार ड्रायव्हिंग स्कूल
५) न्यू विनायक मोटार ड्रायव्हिंग स्कूल
६) क्षिरसागर मोटार ड्रायव्हिंग स्कूल
७) श्री उदय मोटार ड्रायव्हिंग स्कूल
८) जाधव मोटार ड्रायव्हिंग स्कूल
९) समर्थ मोटार ड्रायव्हिंग स्कूल
१०) महेश मोटार ड्रायव्हिंग स्कूल
११) न्यू समर्थ मोटार ड्रायव्हिंग स्कूल
१२) न्यू कैलासगिरी मोटार ड्रायव्हिंग स्कूल
१३) नितीन मोटार ड्रायव्हिंग स्कूल
१४) न्यू प्रगती मोटार ड्रायव्हिंग स्कूल
१५) विरेंद्र मोटार ड्रायव्हिंग स्कूल
१६) मोटार ट्रान्सपोर्ट ऑफ पुणे सिटी मोटार ड्रायव्हिंग स्कूल
१७) न्यू कैलासगिरी मोटार ड्रायव्हिंग स्कूल
१८) जगदीश मोटार ड्रायव्हिंग स्कूल
१९) लॉर्ड रामा मोटार ड्रायव्हिंग स्कूल
२०) गौरांग मोटार ड्रायव्हिंग स्कूल
२१) भरत मोटार ड्रायव्हिंग स्कूल
२२) गणेश मोटार ड्रायव्हिंग स्कूल
२३) योगीराज मोटार ड्रायव्हिंग स्कूल
२४) क्लासिक मोटार ड्रायव्हिंग स्कूल
२५) स्वराज मोटार ड्रायव्हिंग स्कूल
२६) स्वरा मोटार ड्रायव्हिंग स्कूल
२७) श्री मोटार ड्रायव्हिंग स्कूल
२८) साई मोटार ड्रायव्हिंग स्कूल
२९) एकलव्य मोटार ड्रायव्हिंग स्कूल
३०) गॅलॅक्सी मोटार ड्रायव्हिंग स्कूल
३१) मुळीक मोटार ड्रायव्हिंग स्कूल
३२) श्री रामलिंग मोटार ड्रायव्हिंग स्कूल
३३) एम. के. महेश मोटार ड्रायव्हिंग स्कूल
३४) ब्रम्हा मोटार ड्रायव्हिंग स्कूल
३५) न्यू अक्षय मोटार ड्रायव्हिंग स्कूल
३६) श्री व्यंकटेश्वरा मोटार ड्रायव्हिंग स्कूल






