पुणे शहर
पुण्यात रविवारी ४ हजार नवे कोरोना बाधित; पण परिस्थिती नियंत्रणात महापौर मुरलीधर मोहोळ

पुणे : पुणे महापालिका हद्दीत आज ४ हजार ०२९ नवे कोरोनाबाधितांची नोंद झाली असली तरी १४ हजार ८९० सक्रीय रुग्णांपैकी केवळ ५.४८ रुग्ण रुग्णालयात आहेत. शिवाय आज केवळ एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असून काळजी करण्याऐवजी काळजी घ्यावी, इतकंच असे आवाहन महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केले आहे.
पुणे कोरोना अपडेट : रविवार, दि. ०९ जानेवारी २०२२
◆ उपचार सुरु : १४,८९०
◆ नवे रुग्ण : ४,०२९ (५,२६,०३५)
◆ डिस्चार्ज : ६८८ (५,०२,०१८)
◆ चाचण्या : १८,०१२ (३९,७७,३८१)
◆ मृत्यू : १ (९,१२७)













