पुणे शहर

शाळा प्रशासनाच्या दुर्लक्षामुळेच विद्यार्थिनीवर अत्याचार ; शाळेवर गुन्हा दाखल करण्याची राष्ट्रवादी युवक काँग्रेसची मागणी..

पुणे : Pune city काल शिवाजीनगर भागातील एका शाळेतील विद्यार्थिनीवर शाळेच्या आवारात लैंगिक अत्याचार झाल्याचा प्रकार समोर आला आहे. संबंधित आरोपीला पोलिसांनी त्वरीत अटक केली असली तरी शाळेच्या निषकाळजी मुळे हा प्रकार घडला असल्याने संबधित शाळेवर ही गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष किशोर कांबळे यांनी पोलिसांकडे केली आहे.

या संदर्भातील मागणीचे पत्र कांबळे यांच्याकडून शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकांना देण्यात आले आहे. यावेळी कार्याध्यक्ष मनोज पाचपुते, कार्याध्यक्ष अजिंक्य पालकर. स्वप्निल थोरवे, दत्ता जाधव, ॲड. स्वप्निल जोशी, निलेश रुपटक्के, अतुल जोशी, केतन ओरसे, मधुकर भगत आदी उपस्थित होते.

कांबळे यांनी म्हंटले आहे की, पालक आपल्या मुलींना शाळेच्या जबाबदारीवर शाळेत सोडून जातात, शाळेच्या आवारात प्रवेश केल्यानंतर विद्यार्थ्यांची सर्व जबाबदारी शाळा प्रशासनाची असते. या प्रकरणात बाहेरील व्यक्तींनी शाळेच्या आवारात प्रवेश करून त्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचे उघड झाले आहे. ही फक्त मुलींची शाळा असून देखील त्या शाळेच्या आवारात बाहेरील माणसाला प्रवेश कसा काय दिला गेला ? शाळेचे सुरक्षारक्षक यावेळी काय करत होते, असा प्रश्न निर्माण होत आहे.

विद्यार्थिनींच्या सुरक्षेबाबत शाळा प्रशासनाने काही उपाययोजना केलेली दिसत नाही, या सर्व प्रकारात शाळा प्रशासन देखील दोषी असल्याने संबंधित शाळेवर देखील गुन्हा दाखल करावा अशी मागणी पत्राद्वारे करण्यात आली आहे.

Fb img 1647413731457

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये