पुणे शहर

VIDEO : कात्रजमध्ये 20 सिलेंडर्सचे स्फोट

पुणे : कात्रज भागातील गंधर्व लॉनजवळ एका पत्र्याच्या शेडमध्ये ठेवण्यात आलेल्या स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरचे स्फोट ‌झाले आहेत. एकापाठोपाठ दहा सिलींडरचे स्फोट झाल्याने परिसरात घबराट उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले असून आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले आहे.

या आगीत एक व्यक्ती किरकोळ जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. अग्निशमन दलाची सहा वाहने घटनास्थळी दाखल झाली असून त्यांनी आग आटोक्यात आणली आहे . कात्रज भागातील गंधर्व लॉनजवळ एका पत्र्याच्या शेडमध्ये सिलेंडरचा साठा करून ठेवण्यात आला होता. पत्र्याच्या शेडमध्ये सिलेंडरचा बेकायदेशीर साठा कऱण्यात आला असल्याची शक्यता अग्निशमन दलाकडून व्यक्त करण्यात आली आहे.

Fb img 1647413731457

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये