राष्ट्रीय

शरद पवारांना यूपीए अध्यक्ष करण्याचा प्रस्ताव

मुंबई : शरद पवार यांच्याकडे यूपीएचं अध्यक्षपद सोपवण्याचा ठराव मांडला गेला आहे. राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत हा ठराव मांडण्यात आला आहे.

‘देशातील सध्याची राजकीय स्थिती लक्षात घेता शरद पवार यांनी काँग्रेस आणि इतर प्रादेशिक पक्षांचं राष्ट्रीय पातळीवर नेतृत्व करायला हवं. शरद पवार हे देशातील सध्याचे सर्वात अनुभवी नेते आहेत. संरक्षण मंत्री आणि कृषी मंत्री म्हणून त्यांचे देशाच्या विकासातील योगदान मोठे आहे. या सर्व बाबी विचारात घेत त्यांच्याकडे विरोधी पक्षाचे नेतृत्व सोपवायला हवे’, असे या ठरावात नमूद करण्यात आले आहे. राष्ट्रवादीच्या गोटातून उघडपणे पवारांना यूपीए अध्यक्षपद देण्याची मागणी पुढे आल्याने राष्ट्रीय राजकारण नवे वळण घेणार असे मानले जात आहे.

मोदी आणि भाजपला टक्कर देण्यासाठी देशपातळीवर सक्षम पर्याय उभा करण्याची आवश्यकता आहे. यासाठी काँग्रेसने लवचिकता दाखवायला हवी, असे शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटले आहे.

Fb img 1647413731457

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये