राजकीय

कोल्हापूरमधील कॉंग्रेसच्या दणदणीत विजयावर चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया, म्हणाले…

कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीतील कॉंग्रेसच्या दणदणीत विजयावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. मतदारांनी दिलेला कौल आम्हाला मान्य असल्याचे आणि भाजप विजयी झाला असता तरीदेखील सत्ताधाऱ्यांनी टीका केली असती आणि पराभव झाला असता तरीही टीका करतील. मला टीकांची सवय झाली आहे, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

विकासाच्या मुद्द्यावर आम्ही ही निवडणूक लढवली, आम्हाला राज्यात काम करण्यासाठी फक्त पाच वर्षे मिळाली. पण यामध्ये आम्ही कोल्हापूरच्या विकासासाठी गोष्टी मांडल्या. अखेर कोणाला कौल द्यायचा हे मतदारांनी ठरवायचं असतं, अशी प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. दरम्यान, या पराभवानंतर तुम्ही हिमालयात जाणार का? असा प्रश्न विचारला असता, ‘मला कुठे जायचं आहे हा माझा आणि पक्षातील ज्येष्ठ नेत्यांचा प्रश्न आहे’ असेही उत्तर चंद्रकांत पाटील यांनी दिलं.

Img 20220414 wa0001
Fb img 1648963058213

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये