महाराष्ट्र

अखेर मोरगाव व परिसरात पुरंदर उपसा सिंचन योजनेच्या पाईप लाईन कामाला सुरूवात..

मोरगाव :  श्री क्षेत्र मोरगांव येथील जिरायत भागातील शेतकऱ्यांसाठी पुरंदर उपसा सिंचन योजनेमधून पाणी पुरवठ्याकरीत पाइपलाइन करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातुन व आदर पूनावाला सिरम इन्स्टिट्यूट पुणे यांच्या सीएसआर CSR फंडातून १.३२ कोटी रुपये निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.

या निधीच्या माध्यमातून मोरगाव येथील जोगवडी ते खटकळ ओढा, ढोलेमळा, मोरगाव येथील शेतीला पाणी पुरवठा करण्याकरता पाइपलाइन करता येणार आहे. सदर पाईपलाईनच्या कामासाठी मोरगाव येथील तरुण शेतकरी  अनिल ढोले, चांगदेव ढोले, अविनाश ढोले, हनुमंत ढोले, अंकुश ढोले ,विठ्ठल ढोले, त्रिंबक खोपडे, सखाराम तावरे, नारायण तावरे, विलास तावरे, महादेव ढोले ,अभिजीत ढोले तसेच मोरगावचे विद्यमान सरपंच निलेश केदारी , माजी सरपंच पोपट तावरे व ग्रामपंचायत सदस्य यांनी विशेष कष्ट घेतले आहेत.

या योजनेसाठी शेतकरी, ग्रामपंचायत, सिंचन विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय तसेच व इतर ठिकाणी पत्रव्यवहार व पाठपुरावा इतर बाबींसाठी पुणे महापालिका उपायुक्त संदीप शंकरराव कदम , यांनी समन्वय साधून योजना पूर्ण करणेसाठी विशेष योगदान व सहकार्य केले आहे. कदम हे मोरगांवचे भूमिपुत्र आहे व  आम्हास त्यांचा अभिमान आहे असे मोरगांवचे सरपंच निलेश केदारी व ग्रामस्थांनी सांगितले आहे.

या योजनेमुळे मोरगांव परिसरातील ढोलेमळा, पाटील बुवाचा मळा, चोपणवस्ती, तावरेवस्ती, हनुमाननगर सोनारशेत येथील शेतक-यांना फायदा होणार आहे. तर अंदाजे 450 ते 500 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. तसेच अंदाजे 150 से 200 शेतकरी कुटुंबाचे जीवनमान उंचवणार आहे.

सदर पाईपलाईनचे काम येत्या एक दोन दिवसांत चालू होणार असुन दिड ते दोन महिन्यात पूर्ण करण्याचे नियोजन आहे.. सदर योजनेमुळे मोरगाव व परिसरातील वाडीवस्ती- वरील शेतकरी यांनी समाधान व्यक्त केले आहे तसेच त्यांनी अजित पवार यांचे मुंबई येथे जाऊन सत्कार केला व आभार व्यक्त केले आहेत. सिंचन विभागातील मुख्य अभियंता  गुणाले साहेब व इतर अधिकारी त्यांचेही आभार मानले आहेत.

अखेर मोरगाव व परिसर भागात पुरंधर उपसा सिंचन योजनेच्या पाईपलाईन कामाला सुरूवात “

Img 20220425 wa00102978251768482543832

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये