महाराष्ट्र

रुपाली पाटील-ठोंबरेंची बदनामी केल्याप्रकरणी मनसेच्या 16 पदाधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला नेत्या रुपाली पाटील-ठोंबरे यांची बदनामी केल्याप्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या 16 पदाधिकाऱ्यांविरोधात फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एक करोड ताईवर नाराज’ असणाऱ्यांचा ग्रुप तयार करून अश्लील भाषेत शिवीगाळ करत त्यांची बदनामी करण्यात आली. याप्रकरणी अॅड. पुनम काशिनाथ गुंजाळ (वय 27) यांनी तक्रार दिली आहे. 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते असलेले सागर चव्हाण, गजानन पाटील, प्रसाद राणे, धृवराज ढकेडकर, राजेश दंडनाईक, कुमार जाधव, सचिन कोमकर, सावळ्या कुंभार, निजामुद्दीन शेख, सुधीर लाड यांच्यासह आणखी सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. भादवि कलम 354/अ, ड, 500,34 आयटी ऍक्ट क 66 c 67 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

एक करोड ताईवर नाराज असणाऱ्यांच्या ग्रुपवर जॉईन होण्यासाठी फिर्यादीला फ्रेंड रिक्वेस्ट आली होती. फिर्यादी यांनी ही फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारल्यानंतर त्यांना त्या ग्रुपच्या प्रोफाईलवर अॅड. रूपाली ठोंबरे यांचा फोटो दिसला. त्यांची अश्लील भाषेत खिल्ली उडवली जात असल्याचे फिर्यादी यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर फिर्यादी यांनी महिलेविषयी अशा भाषेत बोलू नका अशी विनंती केल्यानंतरही आरोपी सुधीर लाड याने रूपाली ठोंबरे यांना शिवीगाळ करत असल्याचा लाईव्ह व्हिडिओ टाकून बदनामी केली. फरासखाना पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस निरीक्षक सय्यद करीत आहेत

Img 20220428 wa0008 1
Img 20220425 wa00102978251768482543832

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये