पुणे शहर

भाजप प्रवक्ते विनायक आंबेकर यांना मारहाण

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विरोधात पोस्ट करणारे भाजप प्रवक्ते विनायक आंबेकर यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या संतप्त कार्यकर्त्यांनी मारहाण केली आहे. आंबेकर यांच्या विरोधात दोन दिवसआधीच पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देण्यात आली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आंबेकर यांच्या कार्यालयात जाऊन त्यांना मारहाण केली. अभिनेत्री केतकी चितळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विरोधात अतिशय खालच्या भाषेत टीका केल्यानंतर कार्यकर्त्यांच्या संतप्त भावना सर्वत्र दिसून येत आहेत. राज ठाकरे, जितेंद्र आव्हाड यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांनी चितळे यांच्याबद्दल संतप्त भावना व्यक्त केल्या आहेत. L

भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते प्रा. विनायक आंबेकर यांच्यावर राष्ट्रवादीच्या गुंडांनी भ्याड हल्ला केला असून, भाजपच्या वतीने मी या हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करतो. राष्ट्रवादीच्या या गुंडांवर तात्काळ कारवाई झालीच पाहिजे. विचारांची लढाई विचारांनीच लढायला हवी. हा हल्ला महाविकास आघाडी सरकारच्या डोक्यात सत्तेची हवा गेली असल्याचे दर्शवतो. आगामी निवडणुकीत सत्ताधाऱ्यांच्या डोक्यातील ही हवा उतरवून जनताच त्यांना योग्य धडा शिकवेल, अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी याबाबत व्यक्त केली आहे.

Img 20220425 wa00101037196448559324394 1

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये