महाराष्ट्र

केतकी चितळेवर संतप्त कार्यकर्त्यांनी काळी शाई फेकली

ठाणे : अभिनेत्री केतकी चितळेला ठाणे क्राईम ब्रांचकडे सोपवण्यात येत असताना तिच्यावर काळी शाई फेकण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविषयी केलेल्या एका फेसबुक पोस्टमुळे केतकी चितळेला अटक करण्यात आली आहे.

केतकीनं तिच्या फेसबुकवर केलेल्या पोस्टमध्ये शरद पवारांवर खालच्या स्तरावर टीका केल्यानंतर तिच्यावर कारवाईची मागणी होत होती. तिच्याविरोधात ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर तिला पोलिसांनी चौकशीसाठी नवी मुंबईतून ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर आता तिला अटक करण्यात आली आहे. यादरम्यान, कळंबोली पोलीस स्थानकातून ठाणे क्राईम ब्रांचच्या हवाली करताना स्थानकाच्या बाहेरच राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी केतकी चितळेच्या अंगावर काळी शाई फेकून तिच्या सोशल पोस्टचा निषेध केला. यानंतर पोलीस तिला गाडीत घेऊन गेले. पोलिसांकडून पुढील कायदेशीर कारवाई केली जात आहे. गेल्या सात महिन्यांपासून केतकी कळंबोलीतील अव्हेलोन इमारतीत राहत होती. अभिनेत्री केतकी चितळेनं केलेल्या फेसबुक पोस्टवर राज ठाकरेंनी देखील नाराजी व्यक्त केली आहे.

Img 20220425 wa00101037196448559324394 1

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये