राष्ट्रीय

काश्मीर फाईल्स सिनेमाद्वारे देशात द्वेष पसरवण्याचं काम : फारूख अब्दुल्ला

नवी दिल्ली : निराधार सिनेमाद्वारे देशात द्वेष पसरवण्याचं काम सुरू आहे. काश्मिरी पंडितांवरील हल्ले रोखायचे असतील तर सरकारने निराधार काश्मीर फाईल्स या सिनेमावर बंदी घालावी, अशी मागणी जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूख अब्दुल्ला यांनी केली आहे.

‘केंद्रात सत्तेत असणाऱ्या भाजपने समर्थन केलेला काश्मीर फाईल्स हा सिनेमा सत्यावर आधारित आहे का, असा प्रश्न मी सरकारला विचारला होता. खरंच एखादा मुस्लीम आधी एखाद्या हिंदूला मारेल आणि नंतर त्याचं रक्त भातात टाकून तो भात पत्नीला खायला देईल का? आम्ही इतक्या खालच्या पातळीवर घसरलो आहोत का?’ असा सवालही फारूख अब्दुल्ला यांनी उपस्थित केला आहे.

Img 20220425 wa00101037196448559324394 1

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये