विधान परिषदेचा निकाल; भाई जगताप, प्रसाद लाड, एकनाथ खडसे विजयी; चंद्रकांत हंडोरे पराभूत

मुंबई : महाराष्ट्राच्या विधानपरिषदेची निवडणुकीसाठी महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये जोरदार लढत झाली. भाजपचे प्रसाद लाड, प्रविण दरेकर,उमा खापरे, राम शिंदे, श्रीकांत भारतीय यांचा विजय झाला आहे. तर, शिवसेनेचे सचिन अहिर, आमश्या पाडवी विजयी झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे रामराजे नाईक निंबाळकर, एकनाथ खडसे विजयी झाले आहेत. कॉंग्रेसचे भाई जगताप विजयी झाले आहेत. तर चंद्रकांत हंडोरे पराभूत झाले आहेत.
भाजपचे प्रविण दरेकर, उमा खापरे, राम शिंदे, श्रीकांत भारतीय हे पहिल्या फेरीत विजयी झाले. तर, शिवसेनेचे सचिन अहिर आणि आमशा पाडवी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे एकनाथ खडसे आणि रामराजे नाई निंबाळकर यांचा विजय झाला.
भाजप आमदार लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांच्या मतदानावर काँग्रेसनं आक्षेप घेतला होता. काँग्रेसनं घेतलेला आक्षेप राज्य निवडणूक आयोगानं फेटाळला. त्यानंतर प्रकरण केंद्रीय निवडणूक आयोगाकडं गेलं. केंद्रीय निवडणूक आयोगानं देखील काँग्रेसचा आक्षेप फेटाळल्यानंतर मतमोजणीला सुरुवात झाली.




