अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त वारजेत वृक्षारोपण..

वारजे : महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्षनेते व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त वारजे येथील संजीवन वनोद्यानात वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी देशी झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले.
पुणे महापालिकेतील माजी विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ व शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष बाबा धुमाळ यांच्या वतीने या वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी खडकवासला विधानसभा अध्यक्ष काका चव्हाण, नीलम डोळसकर , मानसी नलावडे, शांता नेवसे , सुरेश जाधव, गायकवाड सर, बापू हांडे, महेश ठाकूर, अरुण पाटील, शिवाजी भोईने व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

वारजे येथे डुक्कर खिंडीजवळ महापालिकेतील विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ यांच्या प्रयत्नातून वन विभागाच्या ३५ एकर जागेमध्ये वन विभाग व पुणे महापालिका यांच्या वतीने संजीवन वानोद्यान साकारण्यात येत आहे. २० ऑगस्ट २०२१ रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते या वनोद्यानाचे भूमिपूजन करण्यात आले होते. त्यानंतर आतापर्यंत विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून अनेक देशी झाडांची लागवड करण्यात आली आहे. त्यामुळे हे उद्यान बहरू लागले आहे. वारजे माळवाडी, कोथरूड परिसरातील नागरिकांच्या निरोगी आरोग्याच्या दृष्टीने हे वनोद्यान महत्वाची भूमिका बजावत आहे.



