महाराष्ट्र

शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटेंचं अपघाती निधन

मुंबई : शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांचे निधन झालं आहे. त्यांच्या गाडीला भीषण अपघात झाला होता. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील माडप बोगद्याजवळ हा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. या अपघातामध्ये विनायक मेटे गंभीर गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर मुंबईतील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू होते.

मेटेंना गंभीर जखमी अवस्थेत कामोठेतील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आल्याची माहिती भाजप आमदार प्रशांत ठाकूर यांनी दिली आहे. विनायक मेटे आपला एक सहकारी आणि बॉडीगार्ड यांच्यासोबत मुंबईच्या दिशेने येत असताना हा अपघात झाला. आज दुपारी १२ वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत मराठा आरक्षणासंदर्भातील बैठकीसाठी ते मुंबईला येत होते. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप आमदार प्रवीण दरेकर एमजीएम रुग्णालयाच्या दिशेने रवाना झाले.

विनायक मेटे यांच्या कारला एका मोठ्या ट्रकने बाजूने धडक दिल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. “आम्ही बीडवरून मुंबईकडे येत होतो. आम्हाला एका मोठ्या ट्रकनं कट मारला. ट्रकच्या बंपरमध्ये कार अडकली आणि काही अंतरापर्यंत फरफटत गेली. आमचा अपघात ५ वाजता झाला. पण मदत पोहोचण्यासाठी एक तास लागला. मी फोन केला तेव्हा कंट्रोल रूमवरच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने प्रतिसाद दिला नाही. जवळपास ६ वाजता रुग्णवाहिका आली”, अशी माहिती विनायक मेटेंचा अपघात झाला तेव्हा त्यांच्यासोबत असणारे सहकारी एकनाथ कदम यांनी दिली आहे. राज्याचे कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विनायक मेटे यांच्या निधनावर प्रतिक्रिया देताना मोठा धक्का बसल्याचं म्हटलं आहे.

Amrutmahotsav 600x600 1
Img 20220804 wa0019951227047229036961
Fb img 1647413711531

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये