पुणे शहर
मिठाई, फरसाण आणि दुग्ध पदार्थ विक्रेता असोसिएशन पुणेच्या वतीने दगडूशेठ हलवाई गणपतीची आरती

पुणे : मिठाई, फरसाण आणि दुग्ध पदार्थ विक्रेता असोसिएशन पुणे च्या वतीने श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची आरती करण्यात आली. यावेळी सर्व पुणेकरांना निरोगी आरोग्य मिळावे अशी प्रार्थना गणरायाकडे करण्यात आली.
संजय चितळे यांच्या हस्ते श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची आरती करण्यात आली. यावेळी अरविंद बुधानी, युवराज गाडवे, केदार चितळे, मुरलीधर चौधरी, अमित अग्रवाल, प्रशांत डाटा, कैलास झंवर, मकरंद गाडवे, तुषार शर्मा, दिनेश अग्रवाल उपस्थीत होते. ट्रस्ट चे विश्वस्त महेश सुर्यवंशी यांनी सर्वांचे स्वागत केले.
मागील दोन वर्ष कोरोना संकटामुळे सर्व व्यवसाय ठप्प होते. विघ्नहर्ता गणरायाचे कृपेने हे मोठे संकट टळले असून जनजीवन सुरळीत होत असताना सर्वांना समृध्दी व निरोगी आयुष्य गणारायाने द्यावे अस मागणं यावेळी असोसिएशनच्या वतीने करण्यात आले.







