पुणे शहर

बावधन खुर्द व बुद्रुक पुणे पोलिस आयुक्त कार्यालय व कोथरूड पोलिस स्टेशनशी संलग्न करण्याची मागणी

नगरसेवक दिलीप वेडेपाटील यांचे देवेंद्र फडणवीस यांना निवेदन..

पुणे : पुणे महानगरपालिका हद्दीतील बावधन खुर्द व बावधन बुद्रुक हा परिसर प्रचंड वेगाने विकसित होणारा  परिसर असून पोलीस खात्याशी संबंधित कामांसाठी नागरिकांना हिंजवडी पोलीस स्टेशन किंवा पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कार्यालय येथे जावे लागते. ही दोन्ही ठिकाणे लांब असल्याने नागरिकांचा वेळ तर जातोच पण त्रास ही सहन करावा लागतो त्यामुळे वरील परिसर पुणे पोलिस आयुक्त कार्यालयाशी व कोथरूड पोलिस स्टेशनशी संलग्न करावा अशी मागणी नगरसेवक दिलीप वेडेपाटील यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

या संदर्भातील निवेदन दिलीप वेडे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिले असून याबाबत लवकरात लवकर निर्णय घ्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे.

बावधन खुर्द येथील चांदणी चौक फ्लाय ओव्हर हा पुणे व पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कार्यालय या दोन्ही कार्यालयाच्या हद्दीमध्ये येत असून सदर ठिकाणी काही अनुचित प्रकार घडल्यास हद्दीच्या घोळामुळे नागरिकांची तारांबळ होते व प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याचे दिलीप वेडे पाटील यांनी म्हंटले आहे. 

बावधन बुद्रुक व खुर्द परिसरातील नागरिकांना होणार त्रास कमी करण्यासाठी हा परिसर त्यांच्यासाठी जवळ असणाऱ्या पुणे पोलिस आयुक्त कार्यालयाशी व कोथरूड पोलिस स्टेशनशी संलग्न करणे आवश्यक आहे. याबाबत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले असून ते याबाबत लवकरच निर्णय घेतील असा विश्वास दिलीप वेडे पाटील यांनी व्यक्त केला आहे.

Fb img 1647413711531

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये