पुणे शहर

पुण्यात गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात काँग्रेसचे जोरदार आंदोलन 

पुणे : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे पुणे दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यामुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. याचदरम्यान अमित शाह यांच्या विरोधात काँग्रेस-वंचितने आंदोलन करण्यात आले.

काँग्रेस शहर अध्यक्ष प्रशांत जगताप आणि माजी दीप्ती चौधरी  यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी पुणे महापालिकेतील काँग्रेस पक्षाचे गटनेते रामचंद्र उर्फ चंदुशेठ कदम आणि पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पुण्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या दौऱ्यामुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जवरून काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. अमित शहा यांच्या सभेआधीच काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीने जोरदार आंदोलन केले.

Img 20260222 wa00063491038201882637992

अमित शाह यांच्या विरोधात पोस्टर झळकवत आणि घोषणाबाजी करत कार्यकर्ते आंदोलन करत आहेत. काँग्रेससोबत वंचित बहुजन आघाडीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा मोठा बंदोबस्त पाहायला मिळत आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज पुणे दौऱ्यावर आहेत. पुण्यात अमित शहा यांच्या हस्ते लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराचे वितरण होणार आहे. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार वितरीत केला जाणार आहे. परंतु या कार्यक्रमाआधी राजकारण तापलं आहे. पुण्यात अमित शाह यांच्या विरोधात काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीने आक्रमक भूमिका घेतली आहे. दिल्लीत विद्यार्थ्यांवर केलेल्या लाठीचार्जवरून आंदोलक अमित शाह यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये