पुणे शहर

कामगार कल्याण केंद्र सणसवाडीच्या “अंत आरंभ” एकांकिकेने पटकावला प्रथम क्रमांक

कामगार कल्याण मंडळ पुणे विभाग- पुणे गटाच्या वतीने आयोजन

पुणे : कामगार कल्याण मंडळ पुणे विभाग- पुणे गटाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या गटस्तरीय खुली महिला एकांकिका नाट्य स्पर्धेत कामगार कल्याण केंद्र सणसवाडीच्या “अंत आरंभ” एकांकिके ने पटकवला प्रथम क्रमांक पटकावला. पुणे विभागाचे प्र. सहाय्यक कल्याण आयुक्त समाधान भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा घेण्यात आली.

या एकांकिका स्पर्धेत एकूण 8 संघानी सहभाग नोंदविला.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लेखिका, जेष्ठ नाट्य दिग्दर्शिका विनीता पिंपळखरे तर प्रमुख पाहुणे हुंदायी सर्व्हिस स्टेशनच्या एच आर हेड शितल सुलाखे तसेच कामगार भूषण पुरस्कार प्राप्त राजेंद्र वाघ उपस्थित होते. स्पर्धेचे परिक्षक म्हणून प्रभाकर पवार, अनुराधा कुलकर्णी, संध्या कुलकर्णी यांनी काम पाहिले.

स्पर्धेचा निकाल

प्रथम क्रमांक – कामगार कल्याण केंद्र सणसवाडी, एकांकिका “अंत आरंभ”
द्वितीय क्रमांक – कामगार कल्याण केंद्र उद्योगनगर, एकांकिका – “नेकी”
तृतीय क्रमांक – कामगार कल्याण केंद्र हडपसर एकांकिका “किटी पार्टी”

Img 20220924 182515 453

उत्कृष्ट अभिनय प्रथम क्रमांक आरती गोगटे द्वितीय क्रमांक सरभी कुलकर्णी, तर तृतीय क्रमांक भारती साठे यांना मिळवला. दिग्दर्शनाचे पुरस्कार प्रथम क्रमांक वैभव नवसकर नाटक अंत आरंभ, द्वितीय क्रमांक सुनिल कुलकर्णी नाटक – नेकी, तर तृतीय क्रमांक सिमा पोंक्षे नाटक – किटी पार्टी

Img 20220910 wa0003

यावेळी संजय सुर्वे यांनी सुत्रसंचालन केले प्रदिप बोरसे यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी केंद्र संचालक सुनिल बोरावडे, अविनाश राऊत, अरुण वाडकर तसेच शुभांगी नावडीकर व प्रतिभा येरम, नरके व आढारी यांचे सहकार्य लाभले. सर्व स्पर्धा सुदर्शन हॉल शनिवार पेठ पुणे येथे पार पडल्या.

एमआयटी कॉलेजच्या कॅम्पस मध्ये लावलेल्या पाकिस्तानच्या झेंड्याचे दहन ( पहा व्हिडिओ)

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये