सांस्कृतिक

गांधी जयंतीनिमित्त चित्रकला स्पर्धेचे आयोजन

मुंबई : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 153 व्या जयंतीनिमित्त मुंबईतील गांधी फिल्म फाऊंडेशनने “पंच्याहत्तरीतील माझा भारत” (How I see my India @75) या विषयावर चित्रकला स्पर्धा आयोजित केली आहे. 2 ऑक्टोबर, 2022 पासून या स्पर्धेला सुरूवात होईल.

Img 20220924 182515 453

ज्येष्ठ कलाकार प्रभाकर कोलते यांचे या स्पर्धेसाठी मार्गदर्शन लाभले आहे. ही स्पर्धा कलाविशारद, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात येत आहे. स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या स्पर्धकांनी 20 ऑक्टोबर, 2022 पर्यंत आपली पेंटींग्ज जमा करायची आहेत. 3’ X 3’ आकाराचे पेंटींग असावेत. निवडण्यात आलेल्या पेंटींग्जचे 2 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर दरम्यान “गांधी फिल्म्स फाऊंडेशन आर्ट गॅलरी”मध्ये प्रदर्शन भरवण्यात येणार आहे. देशभरातील कला विद्यार्थ्यांसह सर्वांसाठी ही स्पर्धा खुली आहे. या स्पर्धेत मोठ्या प्रमाणात सहभागी होण्याचे आवाहन गांधी फिल्मस फाऊंडेशनचे अध्यक्ष नितीन पोतदार यांनी केले आहे.


स्पर्धेसंदर्भातील सर्व माहिती व नियम यांच्या अनुषंगाने गांधी फिल्म फाऊंडेशनच्या वेबसाईटला http://www.gandhifilmsfoundation.org भेट देऊ शकता. कलाविशारद, मुंबई यांच्याशीही  स्पर्धेसंदर्भात कलाकार संपर्क साधू शकतात तसेच, kalaevents@gmail.com या मेलवर मेल किंवा +91 8779023704 वर संपर्क करु शकता.

Img 20220910 wa0003

गांधी फिल्म्स फाऊंडेशन नेमके काय आहे

हा नोंदणीकृत सार्वजनिक न्यास आहे. महात्मा गांधींची आठवण चिरस्थायी ठेवण्याच्या उद्देशाने जानेवारी १९५० मध्ये पं. नेहरू, सरदार पटेल, डॉ. राजेंद्र प्रसाद, आणि इतरांनी एकत्र येउन दिल्लीमध्ये ‘गांधी राष्ट्रीय स्मारक निधी’ची स्थापना केली. गांधींचे विचार देशभरात पोहोचवण्यासाठी त्यांनी ४८ समित्या स्थापन केल्या. त्यापैकी एक म्हणजे गांधी चित्रपट समिती, जी आता ‘गांधी फिल्म्स फाऊंडेशन’ म्हणून ओळखली जाते.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये