पुण्यातील एमआयटी मधील विद्यार्थ्यांच्या गाडीचा भीषण अपघात, 4 वेळा पलटली कार, दोघांचा मृत्यू

पुणे : पुण्यातील मिनी बालाजी मंदीर म्हणून प्रसिद्ध असलेल्या नारायणपूर येथे दर्शनासाठी निघालेल्या चार चाकी वाहनाचा ताबा सुटल्याने कारचा अपघात झाला. हा अपघात इतका भिषण होता कि यामध्ये 5 पैकी दोघे जागीच ठार झाले. दरम्यान ही कार चार पलटी खात हा अपघात झाला आहे. दरम्यान दोन मुले आणि तीन मुली असल्याची माहिती मिळत आहे. जोरदार वाहन चालवत असताना वाहन चालकाचं नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाल्याचे घटनास्थळावरून माहिती मिळाली आहे.
अपघात झालेल्या वाहनात विद्यार्थी असल्याची माहिती देण्यात आली दरम्यान हे विविध राज्यातून शिक्षणासाठी पुण्यातील एमआयटी काॅलेजमध्ये शिक्षण घेत आहेत. या घटनेची माहिती मिळताच सासवड पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा करून जखमींना रुग्णालयात दाखल केले.
१. रचित मोहता वय १८ वर्षे, रा. कलकत्ता, पश्चिम बंगाल, २. गौरव लालवानी वय १९ वर्षे, रा रायपूर, छत्तिसगढ़ यांना डॉक्टरांनी दाखलपूर्व मृत घोषित केले. तर इतर पाच जणांना पुढील उपचारकामी ससुन रूग्णायल येथे हलवले. त्यापैकी दोघाजणांची प्रकृती गंभीर असून त्यांचेवर ससुन रूग्णालय येथे उपचार चालू आहेत. हे विदयार्थी विविध राज्यातील असून ते सर्वजन MIT कॉलेज कोथरूड,पुणे येथे विविध विभागामध्ये शिक्षण घेत आहेत.







