पुणे शहर
पुण्यात मेट्रोचा पूल कोसळल्याची अफवा महापौरांचे स्पष्टीकरण

पुणे : पुणे शहरात मेट्रो प्रकल्पाचे काम वेगाने सुरु आहे. मात्र सोमवार रात्रीपासून समाजमाध्यमामध्ये मेट्रोचा निर्माणाधिन पूल कोसळल्याची छायाचित्रे व्हायरल होत असल्याने अफवा पसरत आहेत. याबाबतीत पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ट्विट करीत ही अफवा असल्याचे स्पष्ट केले आहे.
या अफवेचे फोटो समाज माध्यमावरुन मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले असून ते फोटो पुण्यातील असल्याचा दावा केला गेलाय. मात्र या दाव्यात कोणतेही तथ्य नसून अशी कोणतीही घटना पुण्यात घडलेली नाही.
यासंदर्भात मेट्रोच्या अधिकाऱ्यांशी माझे बोलणे झाले असून हा प्रकार पुणे शहरातील नाही. आपल्यालाही असे फोटोज आणि मेसेज आले असल्यास आपण फॉरवर्ड करु नका असे आवाहन मोहोळ यांनी केले आहे.




