महाराष्ट्र

मी पॉझिटिव्ह.. आपण जिंकुच : तुकाराम मुंढे

नागपूर : आपल्या कार्यशैलीने प्रसिद्ध असलेले प्रशासकीय अधिकारी व नागपूर महानगपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांना कोरोनाची लागण झाली असून ही माहिती त्यांनी फेसबुक पेजवर दिली आहे.

त्यांनी म्हंटले आहे की कोरोनाच्या संक्रमण काळात यंत्रणा प्रमुख म्हणून कार्य करताना अनेकांच्या संपर्कात आलो. काळजी म्हणून काही वेळा कोरोना चाचणी केली. मात्र काल केलेल्या चाचणीत ‘पॉझिटिव्ह’ आलो. लक्षणे नसताना पॉझिटिव्ह आल्याने नियमानुसार ‘गृह विलगीकरणा’त (Home Isolation) आहे. मागील १४ दिवसात जे माझ्या संपर्कात आले असतील, त्यांनी स्वतःची चाचणी अवश्य करून घ्यावी.

मागील साडे पाच महिने कोरोना या विषाणूशी आपण सगळे लढा देत आहोत. लॉकडाऊन, मिशन बिगीन अगेन या माध्यमातून कोरोनाचे संक्रमण थांबविण्याचा आपण सर्वांनीच प्रयत्न केला. या साडे पाच महिन्याच्या काळात प्रत्येक कोरोना वॉरियर्सने कोरोनाला हद्दपार करण्यासाठी निकराचा लढा दिला. आजही देत आहेत. स्थानिक प्रशासन म्हणून नागपूर महानगरपालिका आजही झटत आहे. वेळोवेळी नागरिकांना आवाहन करीत आहे. प्रत्येक व्यक्ती कोरोनाबाधित आहे, असे समजून वागा, असे मी स्वतः वेळोवेळी सांगत आहे. कारण काळजी घेतली नाही तर हा विषाणू जीवघेणा ठरू शकतो. आपल्या आरोग्याची काळजी आपणच घ्यायला हवी असे मुंढे यांनी आपल्या संदेशात म्हंटले आहे.

Related Articles

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये