सिनेजगत

‘तुझ्यात जीव रंगला’फेम अभिनेत्री कल्याणी जाधवचा अपघाती मृत्यू

कोल्हापूर : ‘तुझ्यात जीव रंगला’ या दूरचित्रवाणी मालिकेत राधा ही व्यक्तिरेखा साकारणारी अभिनेत्री कल्याणी कुरळे-जाधव हिचा कोल्हापुरात अपघाती मृत्यू झाला आहे. कल्याणीने कोल्हापूर-सांगली महामार्गावर नुकतेच एक हॉटेल सुरू केलं होतं. शनिवारी (12 नोव्हेंबर) रात्री हे हॉटेल बंद करून बाहेर पडत असताना कल्याणीला एका ट्रॅक्टरने धडक दिली. या धडकेत कल्याणीचा जागीत मृत्यू झाला असून या घटनेची नोंद शिरोली MIDC पोलीस ठाण्यामध्ये झाली असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक सागर पाटील यांनी दिली आहे.

कल्याणी जाधवने ‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेसह स्टार प्रवाहावरील ‘दख्खनचा राजा ज्योतिबा’ आणि सन मराठीवरील ‘सुंदरी’ या मालिकांमध्येही आपल्या अभिनयाची छाप पाडली होती. शिवाय, ती सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय होती. कल्याणी जाधव ही मूळची कोल्हापूरची आहे. ती कोल्हापुरातील राजारामपुरी परिसरात राहते. अभिनयातून वेळ काढून कल्याणीने नुकतेच कोल्हापूरमधील सांगली फाटा परिसरात हालोंडी येथे ‘प्रेमाची भाकरी’ नावाचं स्वतःचं नवं हॉटेल सुरू केलं होतं. या हॉटेलचं काम ती स्वतः पाहत होती.

शनिवारी रात्री हॉटेल बंद करून कल्याणी आपल्या नातेवाईकांसोबत बाहेर पडली. नातेवाईक हे रिक्षामधून तर कल्याणी आपल्या दुचाकीवरून निघाली होती. काही अंतरावर गेले असता तोल जाऊन कल्याणी हिची दुचाकी जोरात चालत्या ट्रॅक्टरला धडकली. कल्याणीला रुग्णवाहिकेतून तत्काळ कोल्हापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला.

Fb img 1647413711531 1
Img 20221012 192956 045 1

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये