पुणे शहर
पुणे स्टेशन परिसरात पीएमपीएल बस चालक आणि दुचाकीस्वाराची तुफान हाणामारी ; पहा व्हिडिओ

पुणे : पुणे स्टेशन परिसरात पीएमपी चालक आणि दुचाकीस्वार या दोघांमध्ये झालेल्या जोरदार हाणामारीचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. दुचाकी चालकाने बस ड्रायव्हरला खाली खेचत मारण्यास सुरवात केली. दुचाकी चालकाचा मित्र ही बस चालकास मारहाण करू लागला हे पाहून बसचा कंडक्टर ही खाली उतरला आणि त्यानेही दुचाकी चालकाच्या मित्रास मारण्यास सुरुवात केली.
पुणे स्टेशन परिसरात पीएमपी चालक आणि दुचाकीस्वार या दोघांमध्ये जोरदार हाणामारी ! pic.twitter.com/QmnjrCK5Ut
— पुणेरी स्पिक्स™ Puneri Speaks (@PuneriSpeaks) November 14, 2022
या धुमचक्रीचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला आहे. पुण्यात अनेकवेळा बस चालक व इतर वाहनचालकांचे सातत्याने वाद होत असतात. या वादाचे रूपांतर बराच वेळा हाणामारीत झाल्याचे पहिला मिळाले आहे.










