पुणे शहर

कोथरूडमध्ये पहिला दंड …पुणे महापालिकेची मोहीम सुरू; पाळीव प्राण्यांनी सार्वजनिक ठिकाणी घाण केल्यास दंड

पुणे : पाळीव प्राण्यांमुळे  सार्वजनिक ठिकाणी आणि उद्यानांमध्ये घेऊन येतात आणि त्यामुळे सर्वत्र घाण पसरते अशा तक्रारी महापालिकेकडे येण्याच प्रमाण वाढले असून महापालिकेकडून आता या विरोधात कारवाईची मोहीम सुरू करण्यात आली आहे. या कारवाई अंतर्गत पुण्यात पहिला दंड कोथरुड भागात आकारण्यात आला आहे.

शहराच्या विविध भागांत पाळीव कुत्र्यांचे प्रमाण लक्षणीय असून रोज सकाळी, दुपारी आणि सायंकाळी नागरिक या प्राण्यांना फिरायला घेऊन जातात. कधी  रस्त्यावर, पदपथावर, तर कधी बागेत फिरतात. प्राण्यांच्या विष्ठेमुळे सार्वजनिक परिसर अस्वच्छ होत असून, दुर्गंधी पसरते.  त्यामुळे अनेक पादचारी मार्ग, रस्ते खराब होत आहेत. त्याचा त्रास इतर नागरिकांना होत असल्याने त्यांनी आक्षेप घेतल्यास वाद निर्माण होत आहे. त्यामुळे महापालिकेने या पाळीव प्राण्यांच्या मालकांच्या विरोधात मोहीम हाती घेतली आहे.

Img 20221110 wa0001303173172162697740

नागरिकांना  प्राणी पाळण्याची आवड असते   शहरात प्राणी पाळण्यासाठी परवान्याची आवश्यकता आहे. अजूनही अनेक नागरिकांनी परवाने घेतलेले नाही.  तसेच परवाना देताना प्राणी सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणार नाही, याची काळजी घ्यावी अशी सूचना देखील महापालिकेने दिलेली आहे.

घरात मांजर पाळायचे असेल तर आता त्यासाठी पुणे महापालिकेचा परवाना घ्यावा लागणार आहे. आरोग्य विभागाच्या या प्रस्तावास स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. पुढील आठ दिवसांत परवान्यासाठी ऑनलाईन प्रक्रिया राबविली जाणार आहे.  महापालिका कायद्यातील तरतुदीनुसार मांजर, कुत्रा, घोडे अशा पाळीव प्राण्यांना घरी ठेवण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे नोंदणी करून त्यासाठी रितसर परवानगी घेणे बंधनकारक आहे.

Fb img 1647413711531 1
Img 20221012 192956 045 1

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये