उध्दव ठाकरेंची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली; निवडणूक आयोगाला पक्षचिन्हाचा निर्णय तातडीनं घेण्याचे आदेश

नवी दिल्ली : पक्षचिन्ह गोठवण्याच्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं दिल्ली हायकोर्टात याचिका दाखल केली होती. शिवसेनेच्या ठाकरे गटाची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. त्याशिवाय निवडणूक आयोगाला पक्षचिन्हाचा निर्णय तातडीनं घेण्याचे आदेश हायकोर्टानं दिले आहेत.
पक्षचिन्ह गोठवण्याच्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं दिल्ली हायकोर्टात याचिका दाखल केली होती. शिवसेनेच्या ठाकरे गटाची याचिका हायकोर्टानं फेटाळली आहे.

धनुष्यबाणासाठी उद्धव ठाकरे गटानं दिल्लीतील हायकोर्टात धाव घेतली होती. पण आज कोर्टानं त्यांची याचिका फेटाळून लावली आहे. हा त्यांना मोठा धक्का मानला जातोय. अंधेरी पोट निवडणुकीच्या आधी निवडणूक आयोगानं धनुष्यबाण आणि पक्षाचं नाव गोठवलं होतं. त्यानंतर शिंदे गटाला आणि उद्धव ठाकरे गटाला नवीन चिन्ह आणि नाव तात्पुरतं दिलं होतं. पण ठाकरे गटाने केंद्रीय निवडणूक आयोगाच्या या निर्णायाविरोधात हायकोर्टात धाव घेतली होती. पण कोर्टानं त्यांची याचिका फेटाळून लावली आहे, त्याशिवाय पक्षचिन्हाचा निर्णय तातडीने घेण्याचे आदेश निवडणूक आयोगाला दिले आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे गट यापुढे काय भूमिका घेणार? याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे.



निवडणूक आयोगाचा अधिकार मान्य करत दिल्ली हायकोर्टानं शिवसेनेची याचिका फेटाळली आहे. त्याशिवाय चिन्हाचा अंतिम निर्णय तातडीने घ्यावा, असे आदेश निवडणूक आयोगाला हायकोर्टानं दिले आहेत. पक्षचिन्हाच्या निर्णायाचे अधिकार हे निवडणूक आयोगालाच आहेत, त्यामध्ये कोर्ट पडत नाही. त्यामुळेच पक्षचिन्हाचा अंतिम निर्णय होईपर्यंत धनुष्यबाण गोठवलेलंच असेल.






