पुणे शहर

विद्यापीठ चौकातील उड्डाणपूलाचे काम तातडीने सुरु करावे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांची पुम्टाच्या बैठकीत मागणी…

पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील दुमजली उड्डाणपुलाचे काम तातडीने हाती घ्यावे. जानेवारी २०२४ पर्यंत हा पूल वाहनचालकांना उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी गुरुवारी पुणे एकीकृत महानगर परिवहन प्राधिकरणाच्या (PUMTA) बैठकीत केली.

विभागीय आयुक्त श्री. सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पोलीस उप आयुक्त वाहतूक विभागाचे श्री. विजय मगर, पीएमपीएमएल चे अधिकारी, पीएमआरडीए चे अधिकारी, स्मार्ट सिटीचे अधिकारी, टाटा कंपनीचे अधिकारी, पिंपरी – चिंचवड मनपाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते. बैठकीत विद्यापीठ चौकातील उड्डाणपुलाचा आढावा घेण्यात आला.

विद्यापीठ चौकातील जुना उड्डाणपूल जुलै २०२० मध्ये पाडण्यात आला. तेव्हापासून गेली अडीच वर्षे तेथे रोजच वाहतुकीची कोंडी होत आहे. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात शिरोळे यांनी लक्षवेधी सुचनेद्वारे या समस्येकडे लक्ष वेधले. त्यावेळी याबाबत पुम्टा ची तातडीने बैठक घेण्यात येईल असे आश्वासन कॅबिनेट मंत्री दीपक केसरकर यांनी विधानसभेत दिले होते. त्यानुसार पुम्टा ची बैठक २२ सप्टेंबर रोजी झाली.

Img 20221126 wa0212847205965836399706

हिंजवडी – शिवाजीनगर मेट्रो चे काम करणाऱ्या टाटा कंपनी आणि पीएमआरडीए यांनी नोव्हेंबर २०२४ पर्यंत नवीन पूल बांधण्याचे नियोजन केले होते. मात्र वाहन चालकांचा त्रास कमी करण्याच्या उद्देशाने पुलाचे बांधकाम एक वर्षात पूर्ण करण्याची शिरोळे यांची आग्रही मागणी पुम्टाच्या बैठकीत मान्य करण्यात आली. त्या कामाचा आढावा घेण्यासाठी पुम्टा ची आज ची बैठक बोलावण्यात आली होती

विभागीय आयुक्त श्री. सौरभ राव यांनी उड्डाणपूल जानेवारी २०२४ पर्यत पूर्ण करण्यासाठी तातडीने या कामातील सर्व अडथळे दूर करण्याची सूचना केली. तसेच मॉडर्न कॉलेज येथील रस्ता सुद्धा लवकरात लवकर करावा. विद्यापीठातून भोसलेनगर कडे जाणाऱ्या नवीन पर्यायी मार्गाचे नियोजन करावे पदपथ कमी करून वाहनांसाठी ज्यादा जागा उपलब्ध करून द्यावी. वाहतूक पोलिसांनी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी योग्य ते नियोजन करावे अशा सूचना त्यांनी दिल्या. सर्व सबंधित विभागांनी सातत्याने समन्वय ठेऊन हे काम गतीने पूर्ण करावे अशी सूचना राव यांनी दिली.

Fb img 1647413711531 1
Img 20221122 wa0117172785890606677739

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये