पुणे शहर

बेकायदा सावकारी करणाऱ्याला अटक

पुणे : व्याजाने घेतलेल्या पैशाची परतफेड केल्यानंतरही धमकावणाऱ्या सावकाराला गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाकडून अटक करण्यात आली. त्याच्याविरोधात विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.योगेश पंडीत भालेराव (वय २७ रा. धानोरी) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत एकाने खंडणी विरोधी पथकाकडे तक्रार अर्ज दिला होता. फिर्यादीला पैशांची गरज असल्याने त्याने भालेराव याच्याकडून दरमहा दहा टक्के व्याजाने चार लाख रुपये घेतले होते.

Img 20221126 wa0212847205965836399706

त्यानंतर वेळोवेळी चार लाख ८० हजार रुपयांची परतफेड केली. त्यानंतर भालेराव यांनी फिर्यादींना शिवीगाळ करून पैशांची मागणी केली. तसेच तक्रारदाराचा टेम्पो ताब्यात घेण्याची धमकी दिली. या प्रकरणी खंडणी विरोधी पथकाकडे तक्रार अर्ज देण्यात आला होता. तक्रार अर्जाची चौकशी करून खंडणी विरोधी पथकाने भालेराव याच्या विरोधात कारवाई केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मोहनदास जाधव, श्रीकांत चव्हाण आणि पथकाने ही कारवाई केली.

Img 20221122 wa0117172785890606677739

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये