महाराष्ट्र

अनिल देशमुख यांना जामीन मंजूर; 13 महिन्यांनंतर तुरुंगाबाहेर येणार

मुंबई :सीबीआय चौकशी करत असलेल्या भ्रष्टाचार प्रकरणी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. १ लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे.

यामुळे तब्बल १३ महिन्यांनंतर अनिल देशमुख तुरुंगाबाहेर येणार आहेत. दरम्यान, देशमुख यांना आणखी १० दिवस तरी तुरुंगातच रहावे लागणार आहे. कारण त्यांच्या जामिनास १० दिवसांची स्थगिती देण्यात आली आहे. कारण मुंबई उच्च न्यायालयाने मंजूर केलेल्या जामिनाविरोधात सीबीआय सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार आहे.

Img 20221212 wa00085709390265651809047

भ्रष्टाचार प्रकरणी माफीच्या साक्षीदाराने दिलेल्या जबाबात कोणतेही तथ्य नसल्याचा युक्तिवाद केल्यानंतर तो ग्राह्य करण्यात आला. यामुळे देशमुख यांनी जामीन मंजूर झाला असल्याची माहिती त्यांच्या वकिलांनी दिली.

अनिल देशमुख यांना १०० कोटींच्या कथित भ्रष्टाचारप्रकरणी अटक करण्यात आली होती. यानंतर त्यांना आरोग्याच्या कारणास्तव उपचारासाठी परवानगी देण्यात आली होती. दरम्यान, अनिल देशमुख यांनी न्यायालयाकडे जामिनासाठी अर्ज केला होता. पण सीबीआयने अनिल देशमुख यांच्या जामिनाला विरोध करत त्याला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. पण अखेर देशमुख यांना न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे.

Img 20221212 wa00108437452048883631406

७३ वर्षीय देशमुख हे गेल्या काही दिवसांपासून अतिताण, ह्रदयविकार यांसारख्या विविध आरोग्याशी संबंधित समस्यांनी त्रस्त आहेत. सीबीआयने कथित खंडणी वसुली प्रकरणात केलेले सगळे आरोप तथ्यहीन, निराधार असल्याचा युक्तिवाद देशमुख यांच्या वकिलांनी केला होता.

Img 20221212 wa0009708481580199560968

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये