अर्थजगत

IPPB Alert : पोस्टाच्या पेमेंट बँकेचा खातेधारकांना इशारा

पुणे : सायबर गुन्ह्यांचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेने आपल्या ग्राहकांना सावध केले आहे. IPPBOnline च्या नावाने बनावट कॉल करून लोकांची खाती रिकामी केली जात आहेत. पोस्ट ऑफिसच्या नावावर कॉल करून जॉब देण्याच्या नावाखाली फसवणूक करणारे ग्राहकांकडून त्यांचे खाते आणि वैयक्तिक तपशील घेतात. याशिवाय नोकरीच्या बदल्यात पैशांची मागणीही करतात. वेगवेगळी माहिती देत लोकांची खाती रिकामी करत आहेत.

इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ट्विट करून माहिती दिली आहे की, आजकाल सायबर गुन्हे करणारे लोक आयपीपीबीच्या नावाखाली फसवणुकीच्या घटना घडत आहेत. विचार न करता कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका. तसेच, तुमचे वैयक्तिक बँकिंग तपशील शेअर करू नका. त्यामुळे तुम्ही सायबर गुन्ह्यांपासून सुरक्षित राहाल. अशा प्रकारे तुमचे IPPB खाते सुरक्षित ठेवा. जर तुम्हाला कोणी IPPB च्या नावाने कॉल केला असेल तर विचार न करता तुमची वैयक्तिक माहिती शेअर करू नका.

याशिवाय नोकरीच्या कोणत्याही आश्वासनाच्या फंदात पडण्यापूर्वी, ज्या कंपनीच्या नावाने तुमच्याकडून वैयक्तिक माहिती मागवली जात आहे, त्या कंपनीची सत्यता तपासा. तुमची वैयक्तिक माहिती किंवा बँक तपशील कोणत्याही अज्ञात व्यक्तीसोबत शेअर करू नका. कोणत्याही व्यक्ती किंवा कंपनीला पैसे हस्तांतरित करण्यापूर्वी, कंपनी आणि व्यक्तीची सत्यता पडताळून पहा.

Img 20221208 wa02032955979125892891663
Fb img 16474137314577667123777135621121

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये