पुणे शहर

पुणे जिल्हा ग्रंथालय संघाच्या अध्यक्षपदी विजयराव कोलते

पुणे : पुणे जिल्हा ग्रंथालय संघाच्या अध्यक्षपदी पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तसेच म्हाडाचे माजी अध्यक्ष विजयराव कोलते यांच्यासह इतर नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

संघाच्या प्रमुख कार्यवाह पदी सोपानराव राघूजी पवार, कार्याध्यक्ष पदी चंद्रशेखर भास्कर कपोते, उपाध्यक्ष मार्कंडेय मल्लया मिठापल्ली , ह.भ.प.मोहन शिंदे महाराज, राजू कुंडलिक घाटोळे, कोषाध्यक्ष पदी संतोष राजाराम गोफणे, सहकार्यवाह पदी राजेंद्र ढमाले, विलास चोंधे या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांची सन २०२३ ते २०२६ करीता निवड करण्यात आली.

Img 20230111 wa0008

ही निवड पुणे जिल्हा ग्रंथालय संघाच्या कार्यालयात कार्यकारी मंडळाच्या सभेत मंगळवार दि.१०-०१-२०२३ रोजी बिनविरोध करण्यात आली. या पुर्वी पुणे जिल्हा ग्रंथालय संघाला अध्यक्ष म्हणुन साहित्यिक आणि राजकीय अंग असलेल्या माजी आमदार बाळासाहेब बारमुख आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाराष्ट्र प्रदेश अंकुश काकडे यानंतर लाभलेले विजयराव कोलते हे तिसरे अध्यक्ष आहेत.

Img 20221126 wa02123601048173337149659

आचार्य अत्रे नगरी सासवड येथे संपन्न झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कोलते यांनी महत्वपुर्ण जबाबदारी पार पाडली होती. समाजकारण , राजकारण, साहित्य , कला क्षेत्रात कोलते हे अतिशय उत्तम काम करत आहेत. पुणे जिल्ह्यातील राजकारणात वाचन साहित्याची गोडी व आवड असणारे जे मोजके नेते आहेत त्यापैकी एक विजयराव कोलते. सासवड येथे आचार्य अत्रे प्रतिष्ठानच्या माध्यमातुन गेली अनेक वर्षे ते साहित्य संमेलन घेत आहेत. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनही त्यांनी पुरंदर सारख्या जिरायती भागात घेऊन यशस्वी केलं. मुळशी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे निरीक्षक म्हणून त्यांनी अतिशय उत्तम कार्य केले आहे. ग्रंथालय चळवळ अधिक व्यापक होण्याकरिता कोलते यांचे योगदान निश्चित मिळेल हा विश्वास जिल्ह्यातील ग्रंथालयीन कार्यकर्त्यांनी व्यक्त केला

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये